'झी मराठी'वर जिंका ११ लाखाची पैठणी

'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे.

Updated: Mar 27, 2022, 10:37 PM IST
'झी मराठी'वर जिंका ११ लाखाची पैठणी title=

मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे. तर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत.  केवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने अठरा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या कार्यक्रमामुळे तमाम वहिनींचे आदेश बांदेकर हे लाडके भावोजी ठरले..

आता आम्ही तुमच्यासाठी एक गुडन्यूज घेवून आलो आहोत. भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी या आधीही झी मराठी वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने दिली आहेत. एक प्रोमो झी मराठीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

याचं कारण म्हणजे, आदेश भाऊजींवर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील होम मिनिस्टर चिडल्याचं दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल मिसेस बांदेकर आदेश भावोजींवर का चिडतील ते ही होम मिनिस्टर कार्यक्रमावरुन? याचं कारण म्हणजे आता होम मिनिस्टर कार्यक्रमाचं महापर्व लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या महापर्वात तुम्हाला ११ लाखांची पैठणी जिंकता येणारेय. या संदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडिओ सुचित्रा बांदेकर आदेश भावोजींवर चिढून म्हणतायेत की, ''कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास, हजारो गावं, हजारो घरं अठरा वर्ष, साडेपाच हजार पैठण्या, पण त्यातली एकही पैठणी तुला मला द्यावीशी नाही ना वाटली. आणि आता तर काय महामिनिस्टर घेवून जाणार ११ लाखाची पैठणी. तु बॅग भरायला सांग मला तुझी. भरते काय बघ.' हा व्हिडिओ होममिनिस्टर कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा आहे. हे महापर्व ११ एप्रिल पासून आपल्याला संध्याकाळी 6 ते 7 झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.