'द केरळ स्टोरी' OTT वर का येत मिळत नाही? सुदिप्तो सेनने सांगितले धक्कादायक वास्तव

The Kerala Story OTT Release: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Pravin Dabholkar | Updated: Jun 26, 2023, 07:53 PM IST
'द केरळ स्टोरी' OTT वर का येत मिळत नाही? सुदिप्तो सेनने सांगितले धक्कादायक वास्तव title=

The Kerala Story OTT Release: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अदा शर्मा, सोनिया बालानी आणि योगिता बिहानी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाची देशभरात जोरदार चर्चा झाली. त्यामुळे या चित्रपटाने थिएटरमधून चांगला गल्ला कमावला. द केरळ स्टोरी हा या वर्षातील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. 

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. जरी आता चाहते OTT वर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.यासंदर्भात आता नवीन अपडेट आली आहे. 

'द केरळ स्टोरी'ला OTT वर का नाही?

'द केरळ स्टोरी' चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, चित्रपटाला ओटीटी खरेदीदार मिळत नाहीत.हे वाचल्यावर तुम्हाला देखील नक्कीच आश्चर्य वाटले असेल. 'बॉलीवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'आम्हाला अद्याप द केरळ स्टोरीसाठी कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवरून योग्य ऑफर मिळालेली नाही', असे सुदीप्तो सेन म्हणाले.

'केरळा स्टोरी' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त खरे आहे का? असा प्रश्न सुदिप्तो सेन यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची होती.  सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार ही फेक न्यूज आहे. आम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चांगल्या व्यवहार्य डीलची वाट पाहत आहोत. पण अद्यापपर्यंत आम्हाला विचार करण्यासारखा कोणताही प्रस्ताव मिळालेला नसल्याचे ते म्हणाले. 

आमच्या बॉक्स ऑफिसवरील यशाने चित्रपट उद्योगातील अनेकजण अस्वस्थ आहेत. मनोरंजन उद्योगातील एक वर्ग आमच्या यशाची शिक्षा देण्यासाठी एकत्र आल्याचे सुदिप्तो सेन म्हणाले.

द केरळ स्टोरी ची कथा काय आहे?

'द केरळा स्टोरी'ची कथा एका हिंदू महिलेभोवती फिरते, जी भूमिका अदा शर्माने साकारली आहे. तिला इस्लाम स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाते आणि नंतर तिला सीरियाला पाठवले जाते. परदेशी भूमीत, तिला ISIS या दहशतवादी संघटनेचे सदस्य बनण्यास भाग पाडले जाते आणि त्याच्यावर क्रूर अत्याचार केले जातात. विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाचे निर्माते आहेत.