शिल्पा शेट्टीच्या लग्नाविषयी अनिल कपूरचं धक्कादायक वक्तव्य

 शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात काहि दिवसांपुर्वी एक मोठं वादळ आलं होतं. 

Updated: Nov 3, 2021, 06:41 PM IST
शिल्पा शेट्टीच्या लग्नाविषयी अनिल कपूरचं धक्कादायक वक्तव्य title=

मुंबई : शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात काहि दिवसांपुर्वी एक मोठं वादळ आलं होतं. तिचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केसमध्ये पकडलं गेलं होतं. आणि त्याला जेलची हवाही खावी लागली होती. नुकताच राज कुंद्राने सोशल मीडियापासून लांब रहाण्याचा निर्णय घेतला आहे. याच दरम्यान शिल्पाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओत फराहने हे विचारलं आहे की, तिने राज कुंद्रासोबत लग्न का केलं? 

जुना व्हिडिओ व्हायरल
शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टी बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे जिच्या बद्दल जाणून घेण्यासाठी लोकं सगळ्यात जास्त एक्साईटेड असतात. याच क्रमात सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून लोकं आपलं हसू कंट्रोल करु शकत नाहीयेत.  या व्हिडिओत शिल्पा शेट्टीसोबत अनिल कपूरदेखील दिसत आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा शिल्पा आणि अनिल फराहा खानच्या शोवर गेस्ट म्हणून आले होते. 

व्हिडिओमध्ये फराह खान शिल्पाला एक प्रश्न विचारते. ज्याचं उत्तर अनिल कपूर काही अशा प्रकारे देतो. जे ऐकल्यानंतर शोची होस्ट फराह आणि शिल्पा शेट्टीला हसू सुटतं. फराह शिल्पाला विचारते की, राजने शिट्टी वाजवली होती का? काय केलं होतं ज्यामुळे तु त्याच्याशी लग्न केलंस? या प्रश्नावर अनिल कपूर म्हणतो पैसे दाखवले. अनिल कपूरचं हे उत्तर ऐकून शिल्पादेखील हसू रोखू शकत नाही. ज्यानंतर शिल्पा हसत म्हणते पैशांशिवाय त्याने मिठीत घेण्यासाठी हातही पसरवले होते. यावर अनिल कपूर म्हणतो मिठीत पैसे होते.''

फराहचा मजेदार प्रश्न
यानंतर फराह अनिल कपूरला विचारते, 'तुझ्याजवळ पैसेही नव्हते, तर सुनीता तुला कशी पटली?' यावर अनिल कपूर उत्तरतो, 'कारण सुनीताकडे पैसे होते'. या मजेशीर व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. विशेषत: लोकांना अनिल कपूरचा विनोद आवडला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, 'अनिल कपूरने बरोबर पकडलं'.