Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Updated: Jan 24, 2023, 07:30 PM IST
Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो... title=
Shah Rukh Khan,pathaan

Shah Rukh Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' चित्रपट (Pathaan) 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे. अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 24 कोटींची कमाई शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाने केली आहे. 'पठाण' रिलीज होण्याआधीच शाहरुखच्या फॅन्सची जर काही निराशा झाली असेल, तर ती म्हणजे शाहरुख कुठेही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला नाही. त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. (Why Shah Rukh Khan not giving Interviews for promotion of Pathaan movie latest marathi news)

वर्षातून एक दोन ट्विट करणारा (Shah Rukh Khan) शाहरूख अचानक गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव झालाय. ट्विटवर त्याने #AskSrk नावानं सत्र सुरू केलंय. त्यावेळी त्याने अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांशी संवाद साधताना त्याने अनेक रंजक उत्तर दिली. त्यामुळे चाहत्यांनी देखील शाहरूखच्या या चर्चा सत्राला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलाय.

मंगळवारीही असंच घडलं, जेव्हा शाहरुखने पुन्हा एकदा #AskSrk हॅशटॅग वापरून लोकांशी संवाद साधला. दरम्यान, एका मुलीने शाहरुखची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावर शाहरुख खानने पहिल्यांदाच सांगितलं की तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (Pathaan Promotion) मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देताना किंवा मुलाखत (Interview) देताना का दिसला नाही. त्यावर शाहरूखने पहिल्यांदा उत्तर दिलं.

काय म्हणाला Shah Rukh Khan ?

'माझ्याकडे काही नवीन सांगायचे नाही...जेव्हा ते होईल तेव्हा मी पुन्हा मुलाखतीला सुरुवात करेन...', असं शाहरुख खान (Shah Rukh Khan Tweet) म्हणाला. काहींनी पठाणच्या डायलॉगवर रिल्स शेअर केले आहेत. त्याला देखील रिट्विट करत शाहरूखने आभार मानले आहेत.

पाहा ट्विट - 

दरम्यान, पठाण चित्रपटात शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John abraham) हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला (Pathaan advance booking) ज्याप्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता चित्रपट येत्या काळात धुमाकूळ घालणार हे निश्चित असल्याचं पहायला मिळतंय.