मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. मनोरंजन आणि संगीत विश्वातील ही पोकळी भरून न निघणारी आहे. एका युगाचा अंत झाल्याची भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लतादीदी आता आपल्यात नाही, पण त्यांची कला, संगीत कायम आपल्यात असणार आहे.
लतादीदींचे हजारो गाणी आजही सर्वांना भुरळ घालतात. मराठी, हिंदी, गुजराती अशा 36 भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. प्रसिद्धसोबत खूप प्रेम आणि संपत्ती सगळं काही लतादीदींकडे होतं. मात्र शेवटपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही. लग्न न करण्यामागे एक खास कारण होतं.
लतादीदींच्या आयुष्यात प्रेम नव्हतं किंवा कोणी सोबती मिळाला नसता असंही नाही. मात्र तरीही लतादीदींनी लग्नाचा विचार न करण्यामागे विशेष कारण होतं. 5 भावंड आणि घरची जबाबदारी त्यांच्यावर होती. लता मंगेशकर यांनाही प्रेमाची चाहुल लागली होती मात्र त्यामध्ये यश मिळालं नाही.
'त्या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लतादीदी, कधी ऐकलीये त्यांची 'अधुरी कहाणी...',
घरच्या जबाबदारीमुळे लग्न करू शकले नाही असं लतादीदी लग्नाबद्दल विचारल्यानंतर नेहमी सांगायच्या. त्यांच्या कुटुंबियांनी देखील याच गोष्टीचा उल्लेख केला. 5 भावंडांच्या जबाबदारीमुळे लतादीदी लग्न करू शकल्या नाहीत. त्यांनी नंतरही कधी लग्नाचा विचार केला नाही. त्या अविवाहित राहिल्या.