लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

भारतरत्न, गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेवून जगाचा निरोप घेतलाय

Updated: Feb 6, 2022, 01:51 PM IST
लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली title=

मुंबई : भारतरत्न, गान कोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेवून जगाचा निरोप घेतलाय. गेल्या एक महिन्यापासून कोरोनाशी झुंज देणाऱ्या लता दिदींनी आज आपल्यात नाहीत. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायनात आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने सात दशकं लोकांची मने जिंकली. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्स आणि संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. ही दु:खद बातमी समजल्यानंतर त्याचा बॉलिवूड स्टार्सवर काय परिणाम झाला ते जाणून घेऊया.

अक्षय कुमार 
लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर लगेचच अक्षय कुमारने ट्विटरवर त्यांचं सुरेल आवाज आणि गाणं 'मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे...' या त्यांच्या सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एका ओळीची आठवण करून दिली.

रणवीर सिंह 
अभिनेता रणवीर सिंगने देखील इंस्टाग्रामवर लता मंगेशकरजींचा फोटो शेअर केलाय. कॅप्शनमध्ये हार्टब्रेक ईमोजीसोबत रणवीरने पोस्ट शेअर केली आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परेश रावल
अभिनेते परेश रावल यांनीही ही बातमी ऐकून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये फक्त 'NUMB' या शब्दाचा वापर केला आहे.

शाहिद कपूर
अभिनेता शाहिद कपूर यानेही गान कोकिळा लता मंगेशकर यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली असून, त्या अशा दिग्गज गायिका आहेत की, ज्यांच्या कलेचं वर्णन करायला शब्द कमी पडतात. लताजींचा आवाज जगभरात येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मनात गुंजत राहील असंही शाहिदनं म्हटलं आहे.

दिया मिर्जा 
अभिनेत्री दिया मिर्झानेही ट्विट करून तिची व्यथा मांडली आहे. लता मंगेशकर यांचा आवाज नेहमीच देशाचा आवाज असेल असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्या आपल्या भारतरत्न आहेत. त्या आपल्या देशाचा आवाज होत्या, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

कंगना रनौत 
अभिनेत्री कंगना रानौत हिने इंस्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मी लता मंगेशकर यांना कधीही भेटले नाही, पण आज ही दुःखद बातमी ऐकून मला आपले अश्रू  अनावर झाले आहेत. लताजींचा आवाज हा देशाचा सर्वात सुंदर आवाज होता आणि आता त्यांच्यासारखं कोणी नाही आणि कोणीही नसेल असं तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. श्री रामचंद्र कृपालू भजन ऐकताना कंगना लताजींची आठवण काढत आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे.