आमिर खान, अवॉर्ड फंक्शन्स पासून नेहमीच राहतो दूर, कारण....

'बेटा', 'शेहेनशाह' 'जो जीता वही सिंकदर'मध्ये काट्याची टक्कर तरीही..

Updated: Aug 19, 2018, 09:48 AM IST
आमिर खान, अवॉर्ड फंक्शन्स पासून नेहमीच राहतो दूर, कारण.... title=
छायाचित्र सौजन्य: फेसबुक (aamirkhan)

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता अमिर खान हा चंदेरी दुनियेत राहूनही अवॉर्ड फंक्शन्सना दिसत नाही. दिसलाच तर अगदीच अपवाद. अवॉर्ड फक्शन्सला न दिसणाऱ्या आमिरच्या या गुणाचीही नेहमीच चर्चा होते. अगदी नुकत्याच पार पडलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अमिरच्या या गुणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यामुळे पुन्हा एकदा अवॉर्ड फक्शन्सला आमिर का हजेरी लावत नाही? या प्रश्नाची चर्चा रंगली.

'बेटा', 'शेहेनशाह' 'जो जीता वही सिंकदर'मध्ये काट्याची टक्कर

साधारण १९९२च्या वर्षातला हा किस्सा असावा. सांगितले जाते की, साधारण १९९२ नंतरच आमिरने अवॉर्ड फक्शनला हजेरी लावणे बंद केले. त्या वर्षी बॉलिवूडमध्ये तिन मोठे चित्रपट रिलिज झाले. यात अनिल कपूरचा 'बेटा', अमिताभ बच्चन यांचा 'शेहेनशाह' आणि आमिर खानचा 'जो जीता वही सिंकदर'चा समावेश आहे. तिन्ही चित्रपट एकमेकांना जोरदार टक्कर देत होते. तिन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळे यंदा फिल्मफेयर पुरस्काराच्या यादीत कोणत्या चित्रपटाचा समावेष होईल याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

 'हम हैं राही प्यार के' आणि 'रंगीला'ची जादू फिल्मफेअरसाठी चालली नाही

दरम्यान, आमिर खानचा कयास होता की, ज्या पद्धतीने लोकांचे प्रेम आपल्याला मिळाले आहे. त्याच प्रमाणे चित्रपटालाही पुरस्कार मिळेल. पण, तसे घडले नाही. फिल्मफेयरने अनिल कपूरला उत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित केले. इतकेच नव्हे तर, असेही सांगितले जाते की, पुढची सलग दोन वर्षे अमिर खानचे चित्रपट पुरस्कारांच्या यादीतून बाद होत राहिले. दरम्यान, त्याचे दोन चित्रपट आले. 'हम हैं राही प्यार के' आणि 'रंगीला'. दोन्ही चित्रपट तुफान चालले. पण, आयफाकडून आमिर खानला कोणताच पुरस्कार मिळाला नाही. त्या वर्षीचा पुरस्कार 'बाजीगर' आणि 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'ला मिळाला. या चित्रपटासाठी अभिनेता शाहरुखला उत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. सांगितले जाते की, या घडामोडी घडत होत्या आणि अभिनेता आमिर खानने अवॉर्ड फंक्शन्सला हजेरी लावणे बंद केले होते. आता तर, तो पुरस्कारांवर विश्वासच ठेवत नाही.

'राजा हिंदुस्तानी'ची जादू चालली

दरम्यान, १९९६मध्ये आलेल्या 'राजा हिंदुस्तानी'ने बॉक्स ऑफीस आणि प्रेक्षकांच्या हृदयावर जादू केली. त्याची दखल घेऊन आमिर खानला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर केवळ फिल्मफेयरच नव्हे तर, त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच, पद्मश्री आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. 'ठग्ज ऑफ हिंदूस्तान' चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.