अदनान सामी पाकिस्तानचा द्वेष का करतो? 6 वर्षांनंतर सांगितलं सत्य

अलीकडेच अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहून नागरिकत्वाबाबतच्या निर्णयानंतर त्याला प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Updated: Nov 15, 2022, 07:51 PM IST
अदनान सामी पाकिस्तानचा द्वेष का करतो? 6 वर्षांनंतर सांगितलं सत्य  title=

मुंबई : 2016 मध्ये संगीतकार अदनान सामीला भारताचं नागरिकत्व मिळालं. याआधी तो पाकिस्तानचा नागरिक होता. अनेकदा त्याने देशावरचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.  जेव्हा त्यांनी पाकिस्तान सोडून भारताचे नागरिक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला. अनेकवेळा पाकिस्तानी नागरिक अदनानवर प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत. त्याचवेळी तब्बल 6 वर्षांनंतर आता अदनानने या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडत धक्कादायक खुलासा केला आहे.

अदनान सामीने कटू सत्य सांगितलं आहे
खरं तर, अलीकडेच अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहून नागरिकत्वाबाबतच्या निर्णयानंतर त्याला प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'अनेक लोकं मला विचारतात की मला पाकिस्तानबद्दल इतका द्वेष का आहे? कटू सत्य हे आहे की पाकिस्तानच्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नाही, त्यांनी मला कायमच चांगली वागणूक दिली आहे. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करतो - पीरियड'.

'खूप वर्ष शांत राहिलो मात्र...'
त्याने पुढे लिहिलं आहे की, 'तथापि, मला प्रशासनाची खूप समस्या आहे. जे मला ओळखतात, त्यांनाही कळेल की, प्रशासनानं माझ्यासोबत अनेक वर्षं काय केलं आहे. यामुळेच मला शेवटी पाकिस्तान सोडावं लागलं. एक दिवस, लवकरच मी उघड करीन की माझ्याशी ते कसे वागले आहेत, ज्याची तुम्हाला फारशी कल्पना नाही. माझा हा खुलासा ऐकून सर्वसामान्यांना धक्का बसेल! वर्षानुवर्षे मी याबाबत मौन बाळगलं होतं पण योग्य संधी मिळताच मी सर्व काही सांगेन.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गोंधळ कुठे सुरू झाला
जेव्हा त्याने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर आपलं मत व्यक्त केलं. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला. त्याचवेळी अदनान सामीने याबाबत ट्विट करत 'चांगली टीम जिंकली, इंग्लंडचं अभिनंदन' असं लिहिलं होतं