अभिनेता कुणाल कपूर का म्हणाला, 'विराट माझा गळाच कापेल'

कुणाल कपूरने एका प्रश्नाचं उत्तर देताना हे वक्तव्य केलं... काय होता तो प्रश्न...?

Updated: Sep 6, 2021, 05:49 PM IST
अभिनेता कुणाल कपूर का म्हणाला, 'विराट माझा गळाच कापेल' title=

मुंबई : The empire वेब सिरीज सध्या चर्चेत आहे. या मालिकेत कुणाल कपूर, दिनो मोरिया आणि दृष्टि धामी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. द एम्पायरच्या प्रमोशनसाठी कुणाल (Kunal kapoor) त्याच्या सहकाऱ्यांसह डिनो आणि दृष्टीसह करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये पोहोचला. करणने यासाठी कॉफी शॉट्स विथ करण नावाचा एक विशेष भाग शूट केला.

द एम्पायरचे कलाकार करण जोहरच्या चॅट शो 'द स्पेशल कॉफी शॉट्स विथ करण' च्या विशेष पर्वावर पोहोचले होते. करण त्याच्या शोमध्ये लोकांना गोंधळात टाकणारे प्रश्न विचारतो. त्याने कुणाल कपूरसोबतही असेच काही केले. द एम्पायर वेब सिरीजमध्ये कुणाल कपूर मुघल शासक बाबरची भूमिका साकारत आहे.

अशा स्थितीत, चॅट शो दरम्यान, करण जोहरने (Karan Johar) कुणाल कपूरला रॅपिड फायर प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, तुला कोणाचा गळा कापायला आवडेल, कोणाशी लग्न करायला आवडेल आणि कोणाला तुरुंगात टाकायला आवडेल. यावर करणने तीन अभिनेत्रींची नावे घेतली. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा.(Anushka sharma)

कुणाल अनुष्काबद्दल काय बोलला?

या प्रश्नाला कुणालने उत्तर देताना म्हटलं की, 'मला वाटते की मी ईर्ष्येमुळे आलियाचा गळा कापेल. कारण ती खूप हुशार आहे. मला वाटते की ते नक्कीच होईल. मला अनुष्काशी लग्न करायचे आहे, पण मला वाटते की यासाठी विराट कोहली (Virat kohli) माझा गळा कापेल. आणि मी दीपिकाला तुरुंगात बंद करू इच्छितो कारण ती खूप सुंदर आणि मौल्यवान आहे.'

डिझनी हॉट स्टार प्लस वर द एम्पायरची सुरुवात झाली. ही वेब मालिका अॅलेक्स रदरफोर्डच्या ऐतिहासिक काल्पनिक कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेत राहुल देव, शबाना आझमी आणि आदित्य सील यांच्याही भूमिका आहेत. निखिल अडवाणीने या आठ भागांची मालिका तयार केली आहे. तसेच त्याचे दिग्दर्शन मिताक्षरा कुमार यांनी केले आहे.