Dia Mirza : आपले आवडते बॉलिवूड कलाकार लहाणपणी कसे दिसायचे? कोणत्या शाळेत शिकायचे हे जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. बऱ्याचवेळा कलाकार त्यांच्या लहाणपणीचे फोटो देखील शेअर करताना दिसतात. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. याशिवाय या कलाकारांचे आई-वडील काय करतात हे देखील अनेकवेळा चाहते सर्च करतात. अशाच एका अभिनेत्रीविषयी नेहमीच सोशल मीडियावर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात ती म्हणजे दिया मिर्झा आहे. दिया मिर्झाच्या वडिलांविषयी सोशल मीडियावर अनेक वेळा सर्च करण्यात येते. त्यात सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दिया मिर्झा ही तिच्या वडिलांचं आडनाव लावत नसून तिच्या सावत्र वडिलांचं आडनाव लावते.
दिया मिर्झाविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. तिची आई ही बंगाली आहे तर तिचे वडील जर्मनचे आहेत. तिच्या वडीलांचे नाव फ्रॅँक हॅन्ड्रिच असे आहे. तर दियाच्या सावत्र वडिलांचे नाव हे अहमद मिर्झा असे आहे. खरंतर दियाच्या आईनं जेव्हा तिला जन्म दिला, त्याच्या काही दिवसांनंतर त्या फ्रँड हॅन्ड्रिच पासून विभक्त झाल्या. त्यानंतर त्यांनी अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केले. दिया तिच्या सावत्र वडिलांच्या खूप क्लोज आहे. त्यामुळे दिया तिच्या वडिलांचं नाही तर तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव तिच्या नावापुढे लावते..
दियाच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर दियानं 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत आर माधवन होता. पहिल्याच चित्रपटातून दियानं प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर दिया ही 'तुमको ना भूल पायेंगे', 'दीवानापन', 'लगे रहो मुन्नाभाई', 'दस' आणि 'संजू' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तर दिया ही एशिया पॅसिफीक देखील होती तर नुकतीच दिया ही IIFA 2023 मध्ये दिसली होती. त्यावेळी तिचा लूक पाहून सगळ्यांना प्रचंड आनंद झाला होता. तर अनेकांनी तिच्या लूकची स्तुती केली होती.
हेही वाचा : Sonalee Kulkarni चा साडीत थाटचं न्यारा, तुर्कीत केलेलं फोटोशूट पाहिलंत का?
दियाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. सगळ्यात आधी ती तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत होती. त्यानंतर अचानक लग्नाच्या काही महिन्यांनंतर दियानं तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. त्यानंतर देखील तिच्या बाळाच्या जन्माच्या काही महिन्यांनंतर दियानं बाळाचा फोटो शेअर करत ही बातमी दिली होती.