जगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका

सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Updated: Feb 16, 2019, 11:26 AM IST
जगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय'ने चाहत्यांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमातील 'अपना टाइम आयेगा' हे गाणं तरुणांना विशेष भावलं आहे आणि चाहत्यांनी रणवीरच्या रॅपिंग कौशल्यतेचे कौतुक केले.
 
'गली बॉय' सिनेमाने चाहत्यांच्या मनावर वेगळीच जादू केली आहे. सिनेमाने आंतरराष्टीय पातळीवर आपला प्रभाव पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भलताच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ हॉलिवूड स्टार स्मिथचा आहे. या व्हिडिओमध्ये स्मिथही रणवीरचे कौतुक करताना दिसत आहे. 

 

स्मिथने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. स्मित म्हणतो, 'रणवीर 'गलि बॉय' सिनेमातील तुझी भूमिका मला फार आवडली आहे. माझ्यासाठी, जुन्या शाळेतील हिप-हॉपच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत आणि संपूर्ण जगातून हिप-हॉपला पसंती  मिळत आहे.'

सिनेमात मुंबईच्या झोपडीत राहणाऱ्या स्ट्रिट रॅपरच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत असून आलिया भट्ट त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसत आहे. ९ फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमाचा जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर संपन्न झाला. प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची मजल मारतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.