तुम्हाला कोणासोबत डेटवर जायला आवडेल? करीना कपूर आणि प्रियंका चोप्राने सांगितलं...

बॉलिवूडबद्दल लोकांना कायमच आकर्षण राहिलं आहे. अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कायमच उत्सुकता असते.

Updated: Jun 20, 2022, 06:38 PM IST
तुम्हाला कोणासोबत डेटवर जायला आवडेल? करीना कपूर आणि प्रियंका चोप्राने सांगितलं... title=

मुंबई: बॉलिवूडबद्दल लोकांना कायमच आकर्षण राहिलं आहे. अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कायमच उत्सुकता असते. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे? याबाबत चर्चा रंगत असते. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, प्रियंका चोप्रा यांचे लाखो चाहते आहेत. त्याचबरोबर संजय लीला भन्साली, जॅकी श्रॉफ, गोविंदा, राकेश रोशन यांचाही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांना कोण आवडतं? याबाबत कायमच उत्सुकता असते. 

सिमी गरेवालच्या शोमध्ये या सर्व कलाकारांनी  हजेरी लावली होती. सिमी गरेवालने शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीला जगात कोणत्या व्यक्तीसोबत डेटवर जायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. याबाबत कलाकारांनी खुलासे केले होते. हा थ्रो बॅक व्हिडीओ Rendezvous with Simi Garewal या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओत संजय लीला भन्साली यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नाव घेतलं आहे. तर जॅकी श्रॉफ यांनी सुष्मिता सेन, राकेश रोशन आणि गोविंदाने अभिनेत्री रेखा हीचं नाव घेतलं. तर अभिनेत्री करीना कपूरनं काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका चोप्राने प्रिन्स विलियम्स, तर अमिषा पटेलनेही राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं.