बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप

या गायिकेनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले. दरम्यान, या गायिकेची पोस्ट काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाली होती. 

Updated: Dec 23, 2022, 05:06 PM IST
बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप

Jane Zhang Corona :  कोरोना सध्या शेवटच्या टप्प्यात आहे अशी माहिती समोर आली असतानाच आता याच कोरोनानं सर्वांचा घात केला आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण, कोरोनानं चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, भारतातही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सध्या या विषाणूच्या संसर्गामुळं अनेकांनाच धडकी भरत असून, एका सेलिब्रिटीनं केलेला कहर पाहून बऱ्याचजणांनी कपाळावर हात मारला आहे. कारण, म्हणजे या गायिकेनं स्वत:लाच कोरोना संक्रमित करून घेतलं आहे. या गायिकेनं अस करण्याचा निर्णय कसा घेतला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कोण आहे ही गायिका असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

गायिकेनं खुद्द सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील खुलासा केला आहे. या गायिकेचं नाव जेन झांग (Jane Zhang) आहे. 38 वर्षांची जेन झांग गायिका असण्यासोबतच एक रिकॉर्ड प्रोड्यूसरही आहे. गीतकार अशीही तिची ओळख आहे. डॉल्फिन प्रिंसेस ही तिची वेगळी ओळख आहे. 

हेही वाचा : हा भारत आहे पाकिस्तान नाही... कळतंय का? SRK वर भडकला अभिनेता

कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी म्हणून तिनं गायन क्षेत्रात पदार्पण केलं. 2005 मध्ये तिनं सिंगिंग कॉन्टेस्ट सुपर गर्लमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिनं तिसरं स्थान मिळवलं होतं. 2006 मध्ये तिचा पहिला म्युझिक अल्बम लाँच झाला. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

जेन झांग (Jane Zhang) नं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून खुलासा करत आपण जाणूनबुझून स्वत:ला कोरोना संक्रमित करून घेतल्याचं सांगितलं होतं. एका पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला चिंता वाटत होती की, नव्या वर्षासाठीच्या परफॉर्मन्सदरम्यान माझी तब्येत बिघडू शकते. यामुळे मी अशा लोकांना भेटले जे कोव्हिड पॉझिटिव्ह होते, कारण माझ्याकडे आता व्हायरलपासून बरं होण्यासाठी वेळ आहे. मात्र, ती एका दिवसातच बरी झाली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी जेनला ट्रोल केलं. त्यानंतर जेननं लगेच तिची पोस्ट डिलीट केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेनचे वडील ट्रक ड्रायव्हर होते ज्यांचा मृत्यू झाला आणि नंतर तिच्या आईची देखील नोकरी गेली. अशा स्थितीत वयाच्या 15 व्या वर्षी जेन लोकल पबमध्ये परफॉर्म करायची, पण पुढे जाणून गरज म्हणून केलेल्या कामानं एक दिवस नशीब बदलेलं असं तिला वाटले नव्हते. (who is the chinese singer jane zhang who infected herself with covid 19 in china know in detail) 

2006 मध्ये, जेनचा पहिला म्युजिक अल्बम 'द वन' प्रदर्शित झाला, हा खूप लोकप्रिय ठरला होता. यानंतर त्यानं कधीच मागे वळून पाहिले नाही. तिचा दुसरा अल्बम अपडेट 2007 मध्ये प्रदर्शित झाला. जेननं तिच्या क्षमतेच्या जोरावर मोठे स्थान मिळवले. ती चीनच्या लोकप्रिय गायकांच्या यादीत सामील झाली आहे.