ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आलेली मोहिनी डे कोण?

ए आर रहमानने घटस्फोटाची घोषणा करताच काही तासांमध्ये टीममधील मोहिनी डेने देखील आपल्या पतीपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय. कोण आहे ही मोहिनी डे? जाणून घ्या सविस्तर  

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 20, 2024, 04:42 PM IST
ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर चर्चेत आलेली मोहिनी डे कोण?  title=

A. R. Rahman : संगीतकार ए आर रहमानने त्याची पत्नी सायरा बानोपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी लग्नानंतर 29 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर काही वेळातच एआर रहमानच्या टीममधील मोहिनी डेने देखील तिचा नवरा मार्क हार्टसचपासून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. एआर रहमान आणि त्याच्या बायकोच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर काही तासांमध्येच मोहिनीने देखील घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. दोघांच्या निर्णयानंतर चाहते देखील थक्क झाले आहेत. चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. 

कोण आहे मोहिनी डे? 

एआर रहमानच्या टीममध्ये मोहिनी डे सदस्य आहे. ती मुळची कोलकतामधील असून तिचे वय 29 आहे. जी एक बास वादक आहे. मोहिनी डेने आजपर्यंत एआर रहमानसोबत जगभरात 40 पेक्षा जास्त शोमध्ये काम केलं आहे. अशातच एआर रहमानने आपल्या पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मोहिनी डेने देखील आपल्या पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. 

ए आर रहमानच्या घटस्फोटानंतर मोहिनी डेची पोस्ट चर्चेत 

मोहिनी आणि मार्केने त्यांच्या संयुक्त पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत. सर्वप्रथम, आमचे मित्र आणि कुटुंबीयांशी बांधिलकी म्हणून आम्ही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. आपल्याला जीवनापासून वेगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे आम्ही परस्पर वेगळे होणे हा पुढे जाण्याचा उत्तम मार्ग होता. असं तिने म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आम्ही अजूनही MaMoGi आणि मोहिनी डे गटांसह अनेक प्रकल्पांवर एकत्र काम करणार आहोत. आम्ही एकत्र चांगले काम केलं आहे याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. ते काम पुढे देखील सुरुच राहणार आहे. जगातील प्रत्येक माणसासाठी प्रेम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. कृपया यावेळी आमच्याबद्दल सकारात्मक राहून आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करून आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आदर करा. आमच्या निर्णयावरून कोणतेही अंदाज लावू नका. असं तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.