Maanvi Gagroo ने लपून केलं लग्न! Four More Shots Please, Tripling मुळे आली प्रकाशझोतात

Maanvi Gagroo कोण आहे? कॉमेडीयन वरुण कुमारशी लपून लग्न करणारी मानवी गाग्रु कोण तुम्हाला माहितीये का... 

Updated: Feb 23, 2023, 06:32 PM IST
Maanvi Gagroo ने लपून केलं लग्न! Four More Shots Please, Tripling मुळे आली प्रकाशझोतात title=

Who is Maanvi Gagroo : अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please!) या वेब सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. या मालिकेतील अभिनेत्री मानवी गाग्रुचा (Maanvi Gagroo) नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. मानवीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहेत त्याचं कारण म्हणजे मानवीनं कॉमेडीयन वरुण कुमारशी (Comedian Varun Kumar) जवळच्या मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थित लग्न केले. दरम्यान, सगळ्यांना प्रश्न आहे की मानवी काय करते आणि ती नक्की कोण आहे? (Maanvi Gagroo Wedding) मानवीनं लपून लग्न केल्याचे म्हटले जाते.

कोण आहे मानवी गाग्रु? 

अ‍ॅमेझॉन प्राइमच्या 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please!) या वेब सीरिजमधील पंजाबी मुलगी सिद्धी पटेल या बबली पात्राच्या भूमिकेसाठी मानवी गाग्रू ओळखली जाते. या वेब सीरिजमध्ये अॅमेझॉन मानवीनं अशी भूमिका साकारली आहे ज्या मुलीला बॉडीशेमिंग केलं जातं. तिच्याकडे कशा प्रकारे लोक बघतात आणि तिला वागणूक देतात हे त्यात पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर त्यावर ती कशा प्रकारे स्वत: ला सांभाळते आणि हेल्दी असूनही तिनं कशा प्रकारे स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. मानवीनं याशिवाय उजडा चमन (Ujda Chaman), 'नो वन किल्ड जेसिका' (No One Killed Jessica) आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' (Shubh Mangal Zyada Saavdhan) सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. याशिवाय तिनं 'मेड इन हेवन' (Made In Heaven) या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. यासोबत टीव्हीएफ ट्रिपलिंग (TVF Tripling) सारख्या सीरिज आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मानवीनं तिचं शैक्षणिक शिक्षण हे दिल्लीच्या द मदर्स इन्टर्नशन्ल स्कूलमधून केले आहे. त्यानंतर तिनं दिल्ली युनिव्हर्सिटीच्या गार्गी कॉलेजमधून पुढचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना मानवीनं सायकोलॉजी (Psychology) या विषयात पदवीचे शिक्षण घेतले होते. मानवीनं वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत कथकचं प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मानवीनं जॅझचं प्रशिक्षण घेतले. 

हेही वाचा : Prajakta Mali खरंच संन्यास घेणार? अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वत्र उडवली खळबळ...

मानवीनं तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मानवीनं लाल रंगाची साडी नेसली आहे. तर वरुणनं क्रीम रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचे हे फोटो शेअर करत “आमच्या जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत, आज 24 फेब्रुवारी या पॅलिंड्रोम-इश तारखेला आम्ही आमचं नातं अधिकृत करतोय. तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, आता आमच्या एकत्र प्रवासात आम्हाला आशीर्वाद देत राहा,” असं मानवीने कॅप्शन दिलं आहे.