Dev Anand Granddaughter: एकेकाळी 70 आणि 80 सालातील भारतीय अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या सौंदर्यावर तेव्हाच्या तरूण मुली-मुलं फारच फिदा असायच्या. आजही त्यांचे जुने फोटो पाहिलेत तर आजचीही पिढी त्यांच्यावर फिदा होईल. त्यातीलच एक ज्येष्ठ अभिनेते होते आणि त्यांचे नाव म्हणजे देवानंद यांचे. त्याकाळात देवानंद हे सर्वात मोठे सुपरस्टार होते त्याचबरोबर त्यांची लोकप्रियताही प्रचंड होती. 2011 साली अभिनेते देवानंद यांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा होताना दिसते. त्यांची गाणीही आज चर्चेत असतात सोबतच त्यांच्या गाण्यांचे रिमेक्सही बनतात. परंतु तुम्ही देवानंद यांच्या नातीला पाहिले आहे का, त्यांची नातंही आजच्या बड्या स्टारकीड्सना टक्कर देते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या नातीबद्दल!
गिना नारंग ही ज्येष्ठ अभिनेते देवानंद यांची नातं आहे. सध्या तिचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तिचीच चर्चा रंगली आहे. अनेकांना तिच्याबद्दल माहितीही नसेल. परंतु तिचे फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच विश्वास बसेल की तीही बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या मुलांपेक्षा काही कमी नाही. सध्या ती फॅशन आणि फोटोग्राफीमध्ये आपलं करिअर करते आहे. परंतु सध्या तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. देव आनंद यांच्या परिवाराबद्दल फारसे बोलले जात नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराबद्दलही फारशी कोणाला माहिती आहे. ई 24 बॉलिवूडच्या वृत्तानुसार, सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामुळे सगळीकडे तिचीच चर्चा रंगली आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. काही स्टारकीड्स हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. परंतु त्यातूनही काही स्टारकीड्स हे प्रसिद्धीपासून दूर आपल्या वैयक्तिक आयुष्यात सर्वाधिक व्यस्त राहतात. सध्या सोशल मीडियावर काजोलच्या लेकीची म्हणजे न्यासा देवगणची चांगलीच चर्चा रंगलेली असते. ती कायमच प्रसिद्धीच्या झोतात असते. त्याचबरोबर तिचे अनेक फोटोजही व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे न्यासाची आज चर्चा झाली तर नेटकऱ्यांनाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हेही वाचा - एकासोबत घटस्फोट नंतर दुसरं लग्न त्याआधी बॉबी देओलशी ब्रेकअप, प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत जे स्वत:हूनच लो प्राफाईल राहायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची फारशी चर्चा होत नाही. परंतु ते जरा कुठे सार्वजनिक आयुष्यात दिसले की त्यांचीही जोरात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.