मुंबई : स्वातंत्र्या मिळाल्यानंतर 30 वर्षापर्यंत बॉलिवूडमधील बहुतेक चित्रपट समाज, छळ आणि स्त्रियांवरील अत्याचार अशा विषयांवर आधारित होते. वास्तविक जीवनात जे सुरू आहे, तेचं पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांचा असायचा. अशात एका अभिनेत्रीने सर्वांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्रीचं नाव होतं नझीमा (Nazima). नझीमा एक अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन दिले. नझीमा यांना चित्रपटात अभिनेत्री किंवा अभिनेत्याच्या बहिणीचा नाहीतर त्यांच्या मैत्रिणीचा रोल मिळायचा.
त्यांना कायम चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळायच्या. 70-80 च्या दशकात बहुतेक चित्रपटांमध्ये जेव्हापण महिलांवर होणारे अत्याचार दाखवत असतं तेव्हा त्या भूमिकेत नझीमा असायच्या. नझीमा यांनी करियरची सुरूवात बाल कलाकार म्हणून केली. ज्यानंतर त्यांनी 'जिद्दी', 'आरजू', 'अप्रैल फूल', 'आये दिन बहार के', 'औरत' आणि 'वही लड़की' चित्रपटांमध्ये भूमिका बजावली.
त्यांना चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकण्याची इच्छा होती. पण त्यांच्या वाट्याला कायम सहाय्यक अभिनेत्री आला. पण त्यांनी कोणत्याचं संधीला नकार दिला नाही. चित्रपटांमध्ये काम केलं नाही तर लोक आपल्याला विसरतील, अशी भीती त्याच्या मनात असायची. एक दिवस असा आला, त्यांना मुख्य अभिनेत्रीपेक्षाही अधिक लोकप्रियता मिळू लागली.
पण वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. कर्करोग झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांचे अनेक चित्रपट रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आणि सुपर हिट देखील ठरले.