...अन् शेखर कपूर हातात बेड्या घालून फिल्मफेअर पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले; नेमकं असं काय झालं होतं?

Bandit Queen Filmfare Award: ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांना बँडेट क्वीन (Bandit Queen) चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) जाहीर करण्यात आला होता. फुलन देवीच्या (Phoolan Devi) आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात बलात्कार तसंच हिंसाचार दाखवण्यात आल्याने बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी शेखर कपूर हातात बेड्या घालून मंचावर पोहोचले होते.   

शिवराज यादव | Updated: Jun 30, 2023, 03:29 PM IST
...अन् शेखर कपूर हातात बेड्या घालून फिल्मफेअर पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले; नेमकं असं काय झालं होतं? title=

Bandit Queen Filmfare Award: ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांचं सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट पाहिलं तर तुमच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. शेखर कपूर अनेकदा भूतकाळातील काही जुने व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात. यामधून ते काही मजेशीर, गंभीर किस्सेही सांगतात. दरम्यान नुकताच त्यांनी 1995 च्या फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) सोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहेत. विशेष म्हणजे या फोटोत शेखर कपूर यांच्या हातात पुरस्कार नाही तर याउलट बेड्या दिसत आहेत. शेखर कपूर यावेळी बेड्या घातलेले हाच उंचावून दाखवत असल्याचं दिसत आहे. यानंतर चाहत्यांना नेमकं असं काय घडलं होतं असा प्रश्न पडला होता. त्याचं उत्तरही शेखर कपूर यांनी या पोस्टमध्ये दिलं आहे. 

शेखर कपूर यांनी यामागील कारण उलगडताना सांगितलं आहे की, "बँडेट क्वीनसाठी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फिल्मफेअरने आम्हाला कोणतंही राजकीय किंवा वादग्रस्त वक्तव्य करु नका अशी सूचना केली होती. ही कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवर दाखवला जात होता. या चित्रपटावर अशीही बंदी घालण्यात आली होती. मी माझं आश्वासन पाळलं. मी एकही शब्द बोलला नाही. पण अशाप्रकारे मंचावर बेड्या घालून पोहोचलो होतो".

फुलन देवीच्या (Phoolan Devi) आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात बलात्कार तसंच हिंसाचार दाखवण्यात आल्याने बंदी घालण्यात आली होती. नंतर मात्र सुप्रीम कोर्टाने चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान IMDb ने दिलेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने असभ्यता दाखवणारा 2 मिनिटांची सीन कट केला होता. तसंच अ रेटिंग देत बलात्काराचा सीन छोटा केला होता. टीव्हीवर प्रदर्शित होण्यासाठी चित्रपटातील 17 मिनिटं कमी करण्यात आली होती. 

फिल्मफेअरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शेखर कपूर यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर दिलेल्या भाषणाचाही समावेश आहे. बँडेट क्वीनला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याचं दुःख या या पुरस्काराने कमी केले आहे का? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं ती, “कधीकधी ऑस्कर पुरेसा नसतो. कधी कधी ऑस्करमुळेही फरक पडत नाही. काहीवेळा एखादा चित्रपट ऑस्करपेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो, त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो,”. यावेळी त्यांच्या हातात बेड्या कायम होत्या. 

शेखर कपूर यांनी इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्येही याचा उल्लेख केला आहे. "तुम्ही जर नीट झूम करुन पाहिलंत तर माझ्या हातात बेड्या दिसतील. याला मी #BanditQueen इफेक्ट म्हणेन. अनेकदा शब्दांपेक्षा आपली कृती जास्त भाष्य करते", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @shekharkapur

फोटोमध्ये शेखर कपूर दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. 

शेखर कपूर यांनी 2022 मध्ये आपला शेवटचा चित्रपट केला आहे. What's Love Got to Do with It? हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.