शाहरूख खानने या कारणामुळे अक्षयसोबत शेअर केली नाही स्क्रिन?

किंग खानने स्वतः एका मुलाखतीत केला मोठा खुलासा 

Updated: Jun 23, 2021, 12:29 PM IST
शाहरूख खानने या कारणामुळे अक्षयसोबत शेअर केली नाही स्क्रिन?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आणि अक्षय कुमार दोघंही बॉलिवूडमध्ये सक्रिय अभिनेते आहे. दोघांनी जवळपास एकत्र आपलं करिअर सुरू केलंय. इंडस्ट्रीत 3 दशकाहून अधिक काळ घालवूनही या दोघांनी एकत्र खूप कमी काम केलं. 1997 साली 'दिल तो पागल है' या सिनेमात एकत्र दिसले. मात्र यानंतर हे दोघं कधीच एकत्र दिसलेले नाहीत. आणि आता याची शक्यता देखील कमी आहे. 

अक्षय-शाहरूखला का करायचं नाही एकत्र काम? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरूख खानने एका मुलाखतीतच याबाबत मोठा खुलासा केला होता. मी अक्षयसोबत काम करण्याची शक्यता फारच कमी आहे. डीएनएने विचारलेल्या मुलाखतीत किंग खानने याचा खुलासा केला होता. शाहरूख म्हणाला की,'मी यामध्ये काहीच करू शकत नाही. मी अक्षयप्रमाणे इतक्या सकाळी लवकर उठू शकत नाही. जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा अक्षयच्या उठण्याची वेळ होते. अक्षयचा दिवस लवकर सुरू होता. आणि महत्वाचं म्हणजे मला मी जेव्हा कामाला जाईन तेव्हा त्याचं पॅकअप झालं असेल. मी या बाबतीत थोडा वेगळा आहे. मला रात्री उशिरापर्यंत काम करायला आवडतं. अशी फारच कमी लोकं असतील. ' 

एकत्र क्रिकेट खेळताना दिसले शाहरूख-अक्षय 

'दिल तो पागल' सिनेमात शाहरूख खान आणि अक्षय कुमारचे अतिशय दुर्मिळ असे फोटो व्हायरल झाले.  यामध्ये दोघं क्रिकेट खेळताना दिसले. अक्षय कुमार या फोटोत बॅटिंग करत आहे तर शाहरूख खान विकेटकिपिंग करत आहे. सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा एका फ्रेंडली मॅचचा फोटो आहे. 

'दिल तो पागल है' या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर 1997 मध्ये सिनेमा रिलीज झाला होता. शाहरूख खानचा हा सिनेमा करिअरमधील सर्वात उत्तम सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि शाहरूख खान यांच्या अपोझिट माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर होते.