जेव्हा शाहरूख खानने दिलेल्या गिफ्टमुळे ढसाढसा रडला होता सलमान (व्हिडिओ)

बॉलिवूड किंग शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या मैत्रीवरून अनेक चर्चा नेहमीच सुरू असतात. त्यांच्यात अनेक वाद असल्याच्या, त्यांच्यात हेवे दावे असल्याच्या चर्चा होतात.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 7, 2017, 06:37 PM IST
जेव्हा शाहरूख खानने दिलेल्या गिफ्टमुळे ढसाढसा रडला होता सलमान (व्हिडिओ) title=

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या मैत्रीवरून अनेक चर्चा नेहमीच सुरू असतात. त्यांच्यात अनेक वाद असल्याच्या, त्यांच्यात हेवे दावे असल्याच्या चर्चा होतात.

मात्र त्यांची मैत्री किती आणि कशी आहे. हे सांगणारा एक जुना व्हिडिओ सध्या यूट्यूबवर गाजतो आहे. शाहरूख खानने सलमान एकदा असं गिफ्ट दिलं होतं. ज्याने सलमान खान रडायला लागला होता. 

खरंतर इंडस्ट्रीतील लोक या दोघांच्या मैत्रीचं उदाहरण देतात. या दोघांनी ‘कुछ कुछ होता हैं’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘करन अर्जुन’, ‘ट्यूबलाईट’ या सिनेमात एकत्र काम केलंय. मात्र २००८ मध्ये काही कारणांवरून या दोघांमध्ये फारच वाद झाले होते. तेव्हा ते ऎकमेकांपासून दूर गेले होते. पण आता ते सगळे वाद मिटवून हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. 

‘झी सिने अवॉर्ड’मध्ये शाहरूख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी शाहरूख खानने असे काही केले की, सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शाहरूख त्याला मिळालेला अवॉर्ड चक्क सलमान खानला डेडिकेट केला होता. यावेळी सलमानला अश्रू अनावर झाले होते. 

या व्हिडिओ शाहरूख खान त्याच्यासोबत काम केलेल्या दिग्गज अभिनेत्रींसोबत दिसत आहे. त्यात काजोल, सोनाली बेंद्रे आणि महिमा चौधरी यांचा समावेश आहे.