नेमकं असं काय घडलं ज्यामुळे करिनाला घटस्फोटाची भीती वाटू लागली?

सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लव्हस्टोरी 'टशन' सिनेमापासून सुरु झाली. 

Updated: Oct 26, 2021, 03:46 PM IST
 नेमकं असं काय घडलं ज्यामुळे करिनाला घटस्फोटाची भीती वाटू लागली? title=

मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लव्हस्टोरी 'टशन' सिनेमापासून सुरु झाली. आता हे दोघं दोन मुलांचे पालक आहेत. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. एकदा करिनाने सगळ्यांसमोर अर्जुनला किस करायला नकार दिला होता.

करिनाची बोल्ड फिल्म
सैफ आणि करिनाने लग्नानंतरही आपलं प्रोफेशन बदललं नाही. उलट लग्नानंतर करिनाने आपलं करिअर अजून मजबूत बनवलं. एकीकडे सैफने जिथे आपल्या सिनेमातून अनेक एक्सपेरिमेंट सुरु केले. तर दुसरीकडे करिनाने देखील आपल्यामध्ये अनेक बदल केले. करिनाने बोल्ड स्टेप उठवत लग्नानंतर 'की एंड का' हा सिनेमा साईन केली होती. या सिनेमात तिच्यासोबत अपोजिट अर्जुन कपूर होता. लोकांना ही जोडी भरपूर पसंत आली.

अर्जुनला किस करायला दिला नकार
सिनेमांत करिनाचा बराच बोल्ड अवतार आपल्याला पहायला मिळाला. तिने अर्जुन कपूरसोबत अनेक किसींग सीनदेखील दिले. लग्नानंतर करिनाचं हे रुप बघून प्रत्येकजण हैराण झाला. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका इव्हेंटमध्ये करिनाला अर्जूनला किस करायला सांगितलं गेलं. यावर किरनाने असं करण्यास साफ नकार दिला आणि म्हणाली,''मी किस करु शकत नाही मी जर अर्जुनला किस केलं तर माझा घटस्फोट होईल''

सैफ आणि करिनामध्ये १० वर्षांचं अंतर
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिनाला समजलं की ती प्रेग्नंट आहे. काहि महिन्यांतच तिने तैमुरला जन्म दिला. करिना आणि सैफमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. मात्र त्यांच्या वयाचं अतंराचा  परिणाम त्यांच्या दोघांच्या पर्सनल आयुष्यावर कधीच झाला नाही.