या गाण्याच्या शुटिंगनंतर ओक्षाबोक्षी रडली जुही चावला

असं काय होतं त्या गाण्यात 

या गाण्याच्या शुटिंगनंतर ओक्षाबोक्षी रडली जुही चावला  title=

मुंबई : अनिल कपूरसोबत जुही चावलाने 1994 मध्ये 'अंदाज' या सिनेमात काम केलं. या सिनेमाचं एक गाण खूप चर्चेत आलं. या गाण्याच्या शुटिंग दरम्यानचा हा किस्सा... 90 व्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुही चावलाचा 13 नोव्हेंबर रोजी आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. जुहीने 1986 मध्ये 'सल्तनत' मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा सिनेमा सुपरफ्लॉप ठरला पण त्यानंतरच्या सिनेमाने जुहीला ओळख निर्माण करून दिली. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कयामत से कयामत' तक या सिनेमाने तिला ते यश मिळवून दिलं. 

जुहीने 90 च्या दशकात मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. अनिल कपूरसोबत जुही चावलाची जोडी खूप पसंत केली. अनिल कपूरसोबत जुही चावलाने 1994 मध्ये आलेल्या 'अंदाज' या सिनेमात देखील काम केलं आहे. 

या सिनेमातील खड़ा है, खड़ा है, दर पर तेरे आशिक खड़ा है... हे गाणं खूप चर्चेत होतं. या गाण्याचे लिरिक्स खूप वल्गर होते. या गाण्याच्या शुटिंगनंतर जुही खूप ओक्षाबोक्षी रडली होती. 

एका मुलाखती दरम्यान जुहीने सांगितलं की, या गाण्याचे बोल इतके घाणेरडे होते की, मी खूप अनकंर्फ्टेबल झाली. जुहीने दिग्दर्शक डेविड धवन यांना देखील सांगितलं की, ती या गाण्यावर शूट करू शकत नाही.