मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे नेहमीच चर्चेत असते. एकीकडे जितेंद्रसोबत तिचं लग्न होता- होता तुटलं चालू असताना दुसरीकडे संजीव कुमारही तिच्या प्रेमात होते मात्र बाजी मारली ती धर्मेंद्रने यांनी. या दोघांनी लग्न केलं. हेमा धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि ते चार मुलांचे वडिल होते
आधीच विवाहित व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय सोपा नव्हता पण हेमा यांनी कुणाचंही न ऐकता धर्मेंद्रसोबतचं लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या कित्येक वर्षानंतर, जेव्हा हेमाने बायोग्राफी लॉन्च केली, तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की, या पुस्तकात तिच्या सावत्र मुलं-सनी आणि बॉबी देओलसोबतच्या संबंधांबद्दल काही माहिती आहे का?
त्याला उत्तर देताना हेमा म्हणाली, "आमचा संबंध कसा आहे हे प्रत्येकजण विचार करतो, आमचे संबध खूप गोड आणि सौहार्दपूर्ण आहेत. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा सनी नेहमी धरमजीबरोबर माझ्याकडे येतो. विशेषत: जेव्हा माझा एखादा अपघात झाला होता.
तेव्हा तो मला घरी भेटायला आला होता. डॉक्टर माझ्याशी व्यवस्थित उपचार करत आहेत की नाही आणि माझ्या चेहऱ्यावरील टाके काळजीपूर्वक काढले आहेत की नाही, याची त्याला चिंता होती. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला, म्हणून यावरुन स्पष्ट होतं की, आम्ही कोणत्या प्रकारचे नाते शेअर करतो.