अमिताभ यांनी अनुष्काला धक्का देणारा प्रश्न विचारला...ती लगेच उत्तर देऊन फसली, पण नंतर सुधारीत उत्तरंही मजेदार दिलं

जेव्हा विराट देशासाठी 100 धावा करतो तेव्हा तो पत्नी अनुष्काला मैदानातून फ्लांईग किस देतो

Updated: Apr 26, 2021, 02:37 PM IST
अमिताभ यांनी अनुष्काला धक्का देणारा प्रश्न विचारला...ती लगेच उत्तर देऊन फसली, पण नंतर सुधारीत उत्तरंही मजेदार दिलं  title=

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बॉलीवूडमधील गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना कायमच चाहत्यांचं खूप प्रेम मिळतं. विराटची एक खास गोष्ट आहे. जी, जेव्हा जेव्हा तो देशासाठी 100 धावा करतो तेव्हा तो आपली पत्नी अनुष्काला मैदानातून फ्लांईग किस देतो. या विषयावरुन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एकदा अनुष्का शर्माचा पाय खेचला होता. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन तीन वर्षांपूर्वी सुगी धागा या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कौन बनेगा करोडपती या शोच्या मंचावर गेले होते. जिथे हॉट सीटवर बसलेली कंटेस्टंटला अमिताभ बच्चन यांनी विचारलं होतं की, तुम्ही टीव्हीवर क्रिकेट पाहता का? यावर प्रतिस्पर्धीने सांगितले की नाही. बिग बी म्हणाले होते की, अनुष्का बघते.

एकीकडे स्पर्धक जरा गोंधळते, तितक्यात अनुष्का म्हणते की, तिचा नवरा क्रिकेटपटू आहे आणि ती त्याच्यासाठी क्रिकेट पाहते. तेव्हाच अमिताभ बच्चन तिचा पाय खेचतात आणि म्हणतात फक्त नवऱ्यासाठी... यावंर आपला मुद्दा दुरुस्त करण्यासाठी अनुष्का म्हणते की, संघाला पाठिंबा देण्यासाठी मी क्रिकेट पाहते.

अमिताभ बच्चन यांनी केली अनुष्काची मस्करी
बिग बी अनुष्काची मस्करी करत म्हणतात की,  टीव्हीवर काय घडतं हे सर्वांनाच माहित आहे आणि मैदानातून विराट कॅमेराकडे येवुन फ्लाइंग किस. त्यावेळी अनुष्का, विराट आणि प्रेक्षक जोरजोरात हसु लागतात. यावर्षी जानेवारीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली वामिकाचे पालक बनले. विराट आणि अनुष्का मुलीला सोशल मीडिया आणि फोटोग्राफरच्या नजरेपासून दूर ठेवतात