64 वर्षांच्या अन्नू कपूर यांच्यासोबत प्रियांकाचे इंटीमेट सीन? अभिनेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ

अन्नू कपूर हे अभिनया व्यतिरिक्त सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. 

Updated: Dec 19, 2022, 08:27 PM IST
64 वर्षांच्या अन्नू कपूर यांच्यासोबत प्रियांकाचे इंटीमेट सीन? अभिनेत्याच्या वक्तव्याने एकच खळबळ title=

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांनी आत्तापर्यंत एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. आज त्यांना कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आज त्यांचं नाव बॉलिवूडमध्ये एक खूप मोठं नाव आहे. मात्र हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र यावेळी ते सिनेमामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

अन्नू कपूर हे अभिनया व्यतिरिक्त सोशल मीडियावर बरेच एक्टिव्ह असतात. आणि फॅन्ससोबत कनेक्ट रहाण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. आणि फॅन्सदेखील त्यांच्या प्रत्येक पोस्टवर भरभरुन प्रेम करतात. मात्र दरवेळी पोस्टमुळे किंवा सिनेमामुळे चर्चेत असणारे अन्नू कपूर आता त्यांच्या एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. जे जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल यात काहिच शंका नाही.

अन्नू कपूर यांनी खुलासा करत म्हटलं की, सात खून माफ या सिनेमात प्रियांका चोप्राने सगळ्या कलाकारांसोबत इंटीमेट सीन्स दिले होते. मात्र त्यांच्यासोबत तिने असा एकही सीन दिला नाही. या सिनेमात प्रियांकाचे सात पती असतात असं दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये ती बाकी सगळ्यांसोबत इंटीमेट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत. या सिनेमात तिचे जॉन अब्राहिम, नसीरुद्दीन शाह, नील नितिन मुकेश,इरफान खान आणि अन्नू कपूर तिच्या पतीच्या भूमिकेत होते.

या सिनेमात प्रियांकाने तिच्या सगळ्या पतींसोबत इंटीमेट सीन्स दिले होते. मात्र अन्नू कपूर यांच्यासोबत तिने बोल्ड सीन्स द्यायला साफ नकार दिला. यावर अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, प्रियांकाने यासाठी त्यांच्यासोबत इंटीमेट सीन देण्यास नकार दिला कारण ते दिसायला सुंदर नाही आहेत. 

तर दुसरीकडे अन्नू कपूर म्हणाले की, बाकिच्या अभिनेत्यांसारखे अन्नू कपूर हँण्डसम दिसले असते तर प्रियांकाला त्यांच्यासोबत बोल्ड सीन्स द्यायला काहिच हरकत नव्हती. ज्यावर अभिनेत्रीचं उत्तर हैराण करणारं होतं. प्रियांका म्हणाली, जर अन्नू कपूर इंटीमेट सीन्स करु ईच्छित होते तर, अन्नू कपूर यांना जर इंटिमेट सीन करायचे असतील आणि अशा कमेंट्स करायच्या असतील तर त्यांनी अशाच प्रकारच्या चित्रपटात काम करावं ज्यामध्ये हे सगळं घडतं.