मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको आता एका नव्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. आता सर्व चित्र उलटं झालं असून राधिका गुरुची नवी बॉस झाली आहे. गुरुचं डिमोशन झालयं तर शनाया ऑफिसमधली टेबलं पुसत आहे. आणि यातच राधिकाचा वाढलेला रुबाब गुरु-शनायाला चांगलाच त्रासदायक ठरत आहे.
गुरु-शनाया अगदी त्रासले आहेत. दुखी, कष्टी झाले आहेत. पण हेच तर राधिकाचं स्वप्नं होतं आणि तिने ते अगदी कष्टाने साकारलं.
एकीकडे गुरुचे वडील बायकोच्या (गुरुच्या आईच्या) बदललेल्या मतामुळे त्रस्त आहेत. काळजीत आहेत. तर गुरुची आई आपली बाजू कशी खरी आहे, हे शेजारच्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
त्रासलेली शनाया केडीपुढे आपले मन मोकळे करते. पण गुरुचं काय? गुरु, त्याचा त्रास, दुःख कोणाला सांगणार? म्हणून ऑफिसमध्येच बसून तो विचार करत असतो. राधिकाने केलेला अपमान त्याला आठवतो. आणि त्या अपमानाचा बदला घेण्याचा तो विचार करतो. गेलेली पत, प्रतिष्ठा परत मिळवण्याची प्रतिज्ञा करतो. तर गुरुची ही प्रतिज्ञा खरी होईल का? त्यासाठी नेमके गुरु काय करणार? हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यासाठी पाहत राहा माझ्या नवऱ्याची बायको.