मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानची लव्हस्टोरी खूपच युनिक आणि हटके आहे. अभिनेत्याच्या लव्हस्टोरीची गणना इंट्रेस्टींग लव्हस्टोरीमध्ये केली जाते. 1991 साली शाहरुख खान आणि गौरी खानचं लग्न झालं. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की, शाहरुखने गौरीला पहिल्या व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट दिलं होतं? सध्या व्हॅलेंटाईन विक सुरु आहे. आणि यादरम्यान किंग खानच्या लव्हस्टोरीवर कोणी बोललं नाही असं कसं होईल. नुकतंच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना शाहरुख खानने गौरी खानला कोणती भेटवस्तू व्हॅलेंटाईनला दिली होती याबद्दल सांगितलं आहे.
गौरी खानला मिळालं होतं आगळं-वेगळं गिफ्ट
२०२३ मध्ये शाहरुख खानने ट्विटरवर Ask SRK सेशन त्याच्या चाहत्यांसाठी ठेवलं होतं. यादरम्यान एका चाहत्याने विचारलं होतं की, गौरी मॅमला विचारलं होतं की, व्हेलेंटाईन डे ला तुम्ही गौरीला दिलेलं पहिलं गिफ्ट काय होतं? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, "मला बरोबर आठवत असेल, तर त्या घटनेला ३४ वर्षे झाली आहेत. मी तिला गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या कानातल्या अंगठ्या दिल्या होत्या." शाहरुखची गणना बॉलिवूडच्या सगळ्यात रोमँन्टिक अभिनेत्यामध्ये होते. शाहरुखला हे चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की, खऱ्या आयुष्यात समोरच्याकडे कसं व्यक्त व्हावं.
२०२० मध्ये शाहरुख खानने त्याची पत्नी गौरी खानसोबत एक फोटो शेअर करत लिहीलं की, ३६ वर्ष झाली आता व्हेलेंटाईन सुद्धा आम्हाला विचारुन येतो. निर्बंधाशिवाय असलेल्या प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. 25 ऑक्टोबर १९९१ साली शाहरुख गौरीचं लग्न झालं. शाहरुख मुस्लिम आहे आणि गौरी हिंदू होती. यासाठी दोघांच्या लग्नाआधी बराच तमाशादेखील झाला होता मात्र फायनली या दोघांच्या कुटूंबाने होकार दिला आणि हे कपल लग्नबंधानात अडकलं.
शाहरुख खानचं इंडस्ट्रीमध्ये दमदार कमबॅक
शाहरुख खानने लग्न करुन त्याची पत्नी गौरी खानलां तसं आयुष्य दिलं, ज्याची कल्पना प्रत्येक पुरुष आपल्या कुटूंबासाठी करत असतो. शाहरुख खान आणि गौरी खानला तीन मुलं आहेत. आर्यन खान हा त्यांचा मोठा मुलगा आहे तर सुहाना खान ही त्यांची दुसरी कन्या आहे तर अबराम हा त्यांचा छोटा आणि सर्वात लाडका मुलगा आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, शाहरुख खानने मोठ्या ब्रेकनंतर बॉक्स ऑफिसवर परतला होता. यावेळी त्याने एका मागोमाग एक हिट सिनेमा दिले. आता शाहरुखच्या पुढील प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.