25 वर्ष लग्न होऊनही अर्शद वारसी होता अविवाहित? अभिनेत्यानंच केला खुलासा

Arshad Warsi Register his marriage after 25 years : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनं लग्नाच्या 25 वर्षानंतर लग्न रजिस्टर करण्याचा घेतला निर्णय... हे आहे त्या मागचं कारण

दिक्षा पाटील | Updated: Feb 12, 2024, 04:11 PM IST
25 वर्ष लग्न होऊनही अर्शद वारसी होता अविवाहित? अभिनेत्यानंच केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Arshad Warsi Register his marriage after 25 years : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि मारिया गोरेटी यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या दोघांनी 14 फेब्रुवारी 1999 व्हेलेंटाईन डेच्या निमित्तानं लग्न केलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाला इतके वर्ष होऊनही त्या दोघांनी त्यांचं लग्नाचं रजिस्ट्रेशन केलं नव्हतं. आता लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी त्यांचं लग्न रजिस्टर केलं आहे. 

अर्शद वारसी आणि मारिया या व्हेलेंटाईन डेच्या दिवशी लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. लग्नाला इतकी वर्षे झाली तरी देखील त्यांनी लग्न रजिस्टर करून घेतलं नाही. दरम्यान, अर्शद आणि त्याची पत्नी मारियां 23 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांचं लग्नांचं रजिस्टर केलं आहे. त्या दोघांनी तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे त्यांच्या कधी लक्षात आलं नाही. एकदा एका जवळची व्यक्ती गेल्यानंतर आलेल्या अनुभवानंतर हा सगळा निर्णय घेतला. मात्र, मग आम्हाला कळलं की प्रॉपर्टीचा प्रश्न आला आणि जेव्हा आपण नसतो तेव्हा हे सगळं खूप कामात येतं. त्यांनी म्हटलं की आम्ही हे कायद्यासाठी केलं आहे. बरं मला वाटतं की तुम्ही एकमेकांना भागीदार म्हणून बांधील असाल तर काही फरक पडत नाही.'

अर्शद वारसीनं पुढे सांगितलं की त्यांनी व्हेलेंटाईन डेच्या दिवशीच का लग्न केलं? अर्शद हसत म्हणाला, 'मला कोणालाही माझ्या लग्नाची तारिख सांगायला आवडत नाही. मला त्याची चिड आहे. कारण मला हे फार वेगळं वाटतं. या गोष्टीला घेऊन मी आणि मारिया लाजतो. तसं तर आम्ही या तारखेची निवड कोणताही विचार न करता केली होती. त्या मागे एक किस्सा आहे.'

हेही वाचा : राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?

अर्शदनं सांगितलं की मारियाच्या आई-वडिलांची इच्छा होती की 'आम्ही लग्न करावं. आम्ही मारियाच्या लेंट (हा एक वेगळा उपवास असतो) त्यामुळे आम्ही करू शकलो नव्हतो. मग मी कामात व्यग्र झालो. यात आमचं एक वर्ष वाया गेलं आता आम्हाला परत एक वर्ष वाया घालवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही जी तारिख मिळाली ती निवडली आणि 14 फेब्रुवारी ही तारिख होती. त्यामुळे आम्ही लगेच लग्न केलं.'