Malaika Arora ने लवकर पैसे कमावण्यासाठी केलं असं काम

आता प्रसिद्ध असलेली मलायका अशी आली मॉडलिंग क्षेत्रात   

Updated: Aug 23, 2021, 08:47 AM IST
Malaika Arora ने लवकर पैसे कमावण्यासाठी केलं असं काम title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम फिटनेस आणि सौंदर्यांमुळे चर्चेत असते. सौंदर्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या मलायकाला मॉडलिंग क्षेत्रात एक दशकापेक्षा जास्त काळ झाला आहे.  मॉडलिंग क्षेत्रात प्रचंड मेहनत केल्यानंतर तिला 'एमटीवी सुपरमॉडल ऑफ द ईयर'च्या परीक्षकाचा मान मिळाला.  आता शोच्या पुढच्या भागाचं परीक्षण करण्यासाठी मलायका पूर्णपणे सज्ज झाली आहे. मलायका म्हणते प्रत्येक जण मॉडेल असतो. पण जो रूढीविचारांच्या विरोधात असतो तोच खरा मॉडेल असतो. 

मॉडलिंच्या प्रवासाबद्दल सांगताना मलायका म्हणाली, लहानपणापासूनचं अभिनयाला सुरूवात केली... 90च्या दशकात तिच्याकडे व्हिडिओ जॉकीचा ऑप्शन होता मलाकाने त्या ऑप्शनची निवड देखील केली. त्यानंतर मलायकाने मॉडलिंगमध्ये करियर करण्याचा विचार केला. मलायकाने अनेक जाहिराती, एल्बम, गाण्यांमध्ये काम केलं. 

पण तिला प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे 'दिल से' चित्रपटातील 'छैय्या छैय्या' गाण्यापासून. करियरच्या सुरूवातीचे दिवस आठवत लवकर पैसे कमावण्यासाठी मॉडलिंग क्षेत्रात आली असल्याचा खुलासा मलायकाने केला.  याबद्दल मलायका म्हणाली, 'मॉडलिंग करणं फार आव्हानात्मक होतं. मला असं वाटल पैसे लवकर कमावण्यासाठी उत्तम मार्ग आहे. '

मलायका पुढे म्हणाली, 'माझा तो निर्णय अतिशय उत्तम होता. आतापर्यंतची एक गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले आहेत. लोकांनी ते बदल समजावून घेणे अतिशय गरजेचं आहे. '  मलायका फक्त तिच्या मॉडलिंगमुळे नाही तर फिटनेस आणि खसागी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.