मुंबई: जगभरातील अनेक मंडळींसाठी विश्वसुंदरी हा अत्यंत महत्त्वाचा किताब. प्रतिवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या देशातील एक सुंदरी हा किताब पटकावते. आणि त्याची जगभरात चर्चा होते. पण, तुम्हाला माहिती आहे का विश्वसुंदरीचा किताब पटकावल्यावर किती मानधन मिळते? यंदाचा म्हणजेच 2017चा विश्वसुंदरी हा किताब भारताच्या मानुषी छिल्लरने जिंकला आणि संपूर्ण भारतात त्याचे प्रचंड स्वागत झाले.
अत्यंत कठोर मेहनतीच्या जोरावर हा किताब जिंकलेल्या मानुषीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पण, विश्वसुंदरी हा पुरस्कार मिळणे ही जगभरातील इतर पुरस्कारांप्रमाणे सर्वसामान्य बाब मुळीच नाही. या पुरस्कारानंतर संबंधीत सुंदरीचे आयुष्यच बदलून जाते. अगदी या आधीच्या विश्वसुंधरींच्या कारकीर्दीवर अलपसा कटाक्ष जरी टाकला तरी, तुम्हाला याची खात्री पटू शकते.
विश्वसुंदरी झाल्यावर त्या सुंदरीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तिचा मुकूट. हा मुकूट अत्यंत मौल्यवान असतो. कारण, हा हिरे, माणिक, मोत्यांनी सजविलेला असतो. या मुकूटाची किंमत साधारण 2 कोटी ते 5 कोटी रूपयांपर्यंत असते.
या सोबतच त्या सुंदरीला रोख स्वरूपात काही रक्कमही दिली जाते. ती सुमारे 10 कोटी रूपयांच्या आसपास असते. संपत्तीचा सिलसिला इतक्यावरच थांबत नाही. तर, तिला प्रवास खर्च देखील मिळतो. ज्यात ती संपूर्ण वर्षभरात जगभर कोठेही फिरू शकते. तसेच, प्रवासादरम्यान तिने वापरलेल्या कोणत्याही वाहनासाठी तिला एकही रूपया खर्च करावा लागत नाही.
एकदाका तुम्हाला विश्वसुंदरी बनन्याचा मान मिलाला की, तुमच्यावर स्पॉन्सरशिपचा जणू पाऊसच पडतो. जगभरातील अनेक नामवंत ब्रांड तुमच्यावर पैसे लावायला तयार असतात. या ब्रांडची उत्पादने वापरल्यावर या सुंदरीला एकही रूपया खर्च कारावा लागत नाही. ती सर्व फ्री असतात.
तिच्या सौदर्यामुळे निर्माण झालेल्या चाहते आणि वलयाचा अचूक अंदाज घेऊन त्या सुंदरीला चित्रपट आणि जाहिरातींमध्येही संधी मिळते. ज्यामुळे तिच्या करीअरला नवी आणि वेगळी दिशा मिळू शकते.