अमृता सुभाषच्या ओढणीचं आणि स्मिता पाटील यांच काय आहे कनेक्शन ?

अमृता सुभाषला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' देण्यात आला

Updated: Oct 19, 2019, 11:56 AM IST
अमृता सुभाषच्या ओढणीचं आणि स्मिता पाटील यांच काय आहे कनेक्शन ?  title=

मुंबई : 17 ऑक्टोबर रोजी स्मिता पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. स्मिता पाटील यांनी 80 च्या दशकात सिनेमांमध्ये काम केली आणि ती हिट ठरली. आज इतक्या वर्षांनी देखील 'स्मिता पाटील' हे नाव सिनेसृष्टीत अगदी आदराने आणि प्रेमाने घेतलं जातं. इंडस्ट्री येणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीला स्मिता पाटील या नावाची क्रेझ आहे. त्यांच्यासारखं काम आपल्याला देखील करता यावं ही प्रत्येक अभिनेत्रीची सुप्त इच्छा असते. 

असं असताना अभिनेत्री अमृता सुभाष हिला स्मिता पाटील यांची ओढणी भेट म्हणून मिळाली आहे. याचा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर झालं असं नुकतंच मामी फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचं निमित्त आणि स्मिता पाटील यांचा वाढदिवस याचं औचित्य साधत अमृताने स्मिता पाटील यांची ओढणी घेतली होती.  त्या कार्यक्रमाची आठवण अमृताने शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Today is Smita Patil Ji ‘s birthday. Today was MAMI festival opening ceremony. ThIs dupatta I am wearing is her dupatta. Her sister gifted it to me after watching my film Astu. Her name is Anitatai. She told me after I get old and stop working, I should gift this dupatta to someone who l think is taking ahead Smita tai’s tradition . This is a precious gift. Today on Smita tai’s birthday as I was missing her a lot, I wore this dupatta for MAMI opening. I put a bindi like her and wore jhumkas. And one beautiful thing happened. As I entered the auditorium and the show started a butterfly came there. It did. In those flashy lights it came from nowhere. Everyone was amused. It was flying and then it went outside. It came very near to me. Seeing a butterfly in an award ceremony in an enclosed auditorium was surreal. Then after some time Deepika Padukone and Vishal Ji Bharadwaj awarded Diptiji Nawal, then a video about Dipti di’s work was playing where suddenly Diptidi and Smitadi appeared on screen in a photo . .. my eyes were full of tears.#missing #birthday #favoriteactress आज स्मिताताई पाटीलचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मामी मोहोत्सवाचं उद्घाटन हा अपूर्व योगायोग.. ही ओढणी तिची आहे. तिच्या ताईनं माझं अस्तु मधलं काम बघून मला दिली होती. आणि सांगितलं होतं, तू जेव्हा या क्षेत्रात काम करणं थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल. ही भेट माझ्यासाठी अमूल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण काढत तिची ही ओढणी घेतली. तिच्यासारखं मोठं कुंकू लावून झुमके घालून या समारंभाला पोचले. कार्यक्रम सुरु झाला आणि एक विलक्षण गोष्ट घडली. त्या बंद आॅडीटोरिअम मधे झगमगत्या दिव्यात एक सुंदर फुलपाखरु आलं. प्रेक्षकात उडायला लागलं. अनेकांना त्या ठीकाणी ते फुलपाखरु पाहून आश्चर्य वाटलं. थोड्या वेळ उडून ते निघून गेलं. काहीच वेळात दिपीका पदुकोन आणि विशालजी भारद्वाजांनी दिप्ती नवलजींना पुरस्कार दिला. त्यावेळी दिप्तीदींच्या कामावर आधारित व्हीडीओ सुरु झाला आणि एका अवचित क्षणी स्मितादी आणि दिप्तीदिंचा फोटो पडद्यावर झळकला. माझे डोळे भरुन आले.

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

अमृता सुभाष हीने आतापर्यंत दर्जेदार भूमिका सादर केल्या आहेत. तिचं म्हणणंच असं आहे की, तिचं अफेअर हे दर्जेदार आशयाशी आहे. अमृता सुभाषचं 'अस्तु' या सिनेमातील काम स्मिता पाटील यांच्या बहिणीला प्रचंड आवडलं. सिनेमाच्या प्रिमिअरच्या वेळी स्मिता पाटील यांची मोठी बहिण अनिता यांनी स्मिता पाटील यांनी घातलेली ओढणी अमृताला भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांनी अमृताला सांगितलं की, 'तू स्मीची (स्मिता पाटील) गोष्ट पुढे घेऊन जाशील असं मला वाटतंय. असंच मनापासून काम करं. जेव्हा तुला हे क्षेत्र सोडावसं वाटेल तेव्हा तू ही ओढणी फक्त तुझ्याकडे ठेवू नकोस. तर ही स्मी ची ओढणी अशा  एका अभिनेत्रीला दे, जी स्मी ची गोष्ट पुढे घेऊन जाणार असेल..... 

2017 मध्ये अमृता सुभाषला 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष होते. आतापर्यंत अमृताने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केलं. मराठीबरोबरच आता अमृता हिंदी सिनेसृष्टीत ठसा उमटवण्याचं काम करत आहे.