अभिनेत्री Urmila Nimbalkar च्या बाळाच्या नावात काय दडलंय खास?

अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. 

Updated: Nov 11, 2021, 06:12 PM IST
 अभिनेत्री Urmila Nimbalkar च्या बाळाच्या नावात काय दडलंय खास? title=

मुंबई : अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. तिच्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे काही गोड क्षण तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहत्यांनी तिच्यावर आणि बाळावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागली ती बाळाच्या नावाची...

 उर्मिलाच्या बाळाचे नुकतेच बारसे झाले. बारशाचा व्हिडिओ उर्मिलाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. 

उर्मिलाच्या लेकाच्या बारशाचा सोहळा अतिशय देखण्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यासाठी खास थीम ठरवण्यात आली आहे. या सोहळ्यात तिचे नातेवाईक, मित्र- परिवार सुद्धा छान एन्जॉय करताना दिसत आहेत. यामध्ये उर्मिलाचा भाऊ आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हेदेखील उपस्थित होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्मिलाने तिच्या लेकाच्या बारशासाठी निळ्या रंगाची थीम ठेवली होती. त्यामुळे या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

उर्मिलाने तिच्या बाळाचे नाव 'अथांग' असे ठेवले आहे. अथांग म्हणजे व्यापक. समुद्राला, आकाशाला हे विशेषण दिले जाते. आकाश, समुद्राप्रमाणे आपल्या मुलाचे मन, त्याचे विचार ही व्यापक असू देत... कसलीही जात, धर्म, भाषा, पंथ, नकारात्मकतेची कुठलीच कुंपणे त्याच्या मनाला नकोत या अनुषंगानेच उर्मिला आणि तिच्या नवऱ्याने सुकीर्तने आपल्या बाळाचे नाव अथांग ठेवले आहे.