'शेरशाह'साठी सिद्धार्थ मल्होत्राला सर्वाधिक मानधन, कियाराला ही टाकलं मागे

आजकाल सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या शेरशाह चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 

Updated: Aug 25, 2021, 08:16 AM IST
'शेरशाह'साठी सिद्धार्थ मल्होत्राला सर्वाधिक मानधन, कियाराला ही टाकलं मागे title=

मुंबई :आजकाल सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या शेरशाह चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. कारगिल युद्धादरम्यान शहीद झालेल्या या चित्रपटात त्यांने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. प्रत्येकजण या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचे कौतुक करत आहे. सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटासाठी 7 कोटी रुपये फी मिळाल्याचं बोललं जात आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटात विक्रम बत्राची मंगेतर डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. तिने हे पात्र साकारण्यासाठी 4 कोटी रुपये घेतले.लेफ्टनंट संजीव जिमी जामवालच्या भूमिकेत अभिनेता शिव पंडित खूप जबरदस्त दिसत होते. रिपोर्ट्सनुसार, त्याने यासाठी 45 लाख रुपये घेतले.

निकितिन धीरने चित्रपटात अजय सिंगची भूमिका साकारली होती आणि त्याला या भूमिकेसाठी फी म्हणून 35 लाख रुपये मिळाले होते.विक्रम बत्राचे जवळचे मित्र नायब सुभेदार बन्सी लाल यांची भूमिका अनिल चरणजीत यांनी साकारली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्याला या चित्रपटासाठी 25 लाखांची फी मिळाली आहे.

पवन चोप्राने चित्रपटात विक्रम बत्राचे वडील जीएल बत्रा यांची भूमिका साकारली होती. रिपोर्ट्सनुसार, पवनने या चित्रपटासाठी 50 लाख रुपये घेतले.