कार्तिकविषयी साराला आईकडून महत्त्वाचा सल्ला

अमृताने कार्तिकप्रकरणी साराला रोखलं... 

Updated: Jan 6, 2019, 11:59 AM IST
कार्तिकविषयी साराला आईकडून महत्त्वाचा सल्ला title=

मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खान हिने तिचा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासूनच सारा चर्चेत होती ते म्हणजे तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या एका भागात साराने आपल्या क्रशविषयी खुलेपणाने एक गोष्ट उघड केली होती. ज्यामध्ये तिने 'सोनू के टिट्टू की स्वीटी' फेम अभिनेता कार्तिक आर्यन याचं नाव घेतलं होतं. 

तेव्हापासूनच सारा आणि कार्तिकवर माध्यमांच्या नजरा खिळल्या होत्या. त्यांची उपस्थिती असेल त्या सर्वच कार्यक्रमांमध्ये कार्तिक आणि आर्यन या दोघांनाही त्याच विषयीचे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर अभिनेता रणवीर सिंग याने कार्तिक आणि साराची भेट घडवून आणत एका नव्याच चर्चेला वाव दिला. 

साराच याच संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. इन्स्टाग्रामवर कार्तिकला तू मेसेज केला नाहीस का, अशा आशयाचा प्रश्न विचारताच साराने त्याचं उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधलं. 

'नाही नाही नाही.... किती तेही... मी नेहमीच सांगत आले आहे की मी तितकीची अतिउत्सुक नाही', असं म्हणत आईने आपल्याला या प्रकरणी वाट पाहण्याचाच सल्ला दिल्याचं तिने स्पष्ट केलं. आईचा सल्ला ऐकत आता मी वाट पाहतेय... असं ती म्हणाली. त्यामुळे एका अर्थी कार्तिक आर्यन प्रकरणी साराला अमृताने रोखलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे निदान आतातरी सारा आणि कार्तिकविषयी होणाऱ्या या चर्चांना पूर्णविराम मिळतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.