प्रसूतीनंतर पहिल्यांदाच ग्लॅमरस महिला खासदार कॅमेरासमोर; पती नव्हे, 'या' खास व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर

त्यांच्या गरोदरपणापासूनच बऱ्याच चर्चांना उधाण आलं. 

Updated: Sep 16, 2021, 07:58 AM IST
प्रसूतीनंतर पहिल्यांदाच ग्लॅमरस महिला खासदार कॅमेरासमोर; पती नव्हे, 'या' खास व्यक्तीसोबत गेली डिनर डेटवर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

कोलकाता : देशाच्या राजकीय पटलावर कारकिर्दीमुळे नव्हे, तर आपल्या मादक सौंदर्यामुळं चर्चेत असणारा एक चेहरा म्हणजे अभिनेत्री, खासदार नुसरत जहाँ. खासगी जीवनात आलेलं वादळ, त्यामुळं झालेल्या चर्चा आणि त्यानंतर आता मिळालेली मातृत्त्वाची जबाबदारी नुसरत जहाँ (nusrat jahaan) यांच्या वाट्याला आली. 

जहाँ यांच्या गरोदरपणापासूनच बऱ्याच चर्चांना उधाण आलं. यातून त्यांच्या खासगी जीवनात असणारं अस्थैर्य समोर आलं. अखेर नुसरत जहाँ यांनी एका बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर आता हा चेहरा कॅमेरासमोर आला आहे. 

26 ऑगस्टला गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर नुसरत नुकत्याच एका डिनर डेटवर गेल्या होत्या. पती नव्हे, तर खास मित्र यश दासगुप्ता (yash dasgupta) याच्यासह नुसरतनं काही खास क्षणांचा आनंद घेतला. अभिनेत्री उशोशी सेनगुप्ता हिनं नुसरत आणि यशसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

नुसरतच्या प्रसुतीनंतरच्या काळासाठी हे फोटो शेअर करत त्या माध्यमातून कॅप्शनद्वारे तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नुसरतनं ब्लॅक टॉप आणि व्हाईट प्रिंटेड स्कर्टला पसंती दिली. तर डेनिम आणि टीशर्टमध्ये यशही हँडसम दिसत होता. 

गरोदरपणाच्या काळात नुसरतनं माध्यमांसमोर येणं टाळलेलं. पण, आता मात्र बाळाच्या जन्मानंतर ती कॅमेरासमोर आल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या. 

दरम्यान, नुसरत आणि यश यांच्या नात्याबाबत कायमच चर्चा रंगतात. नुसरत जहाँ यांच्या गरोदरपणामध्ये आणि प्रसूतीच्या वेळी यश त्यांच्यासोबत होता. त्यांनी आपल्या मुलाचं नाव ईशान असं ठेवलं. इंग्रजीत हे नाव Yishaan असं लिहिलं जातं.