रणबीर- आलिया सोडा... अचानकच लग्नबंधनात अडकलेल्या 'या' सेलिब्रिटी कपलला पाहिलं?

मार्च महिन्यातच साखरपुडा केला होता. ज्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

Updated: May 23, 2022, 11:18 AM IST
रणबीर- आलिया सोडा... अचानकच लग्नबंधनात अडकलेल्या 'या' सेलिब्रिटी कपलला पाहिलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : (Ranbir Alia) अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच एका छोटेखानी विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं जितक्या साध्या पद्धतीनं लग्न केलं, ते पाहता सर्वांची मनं या जोडीनं जिंकली. त्यानंर आता रणबीर आणि आलियाच्या नावाच्या चर्चा थांबत नाहीत तोच त्यांनाही मागे टाकणारा एक विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. (Wedding news)

हा विवाहसोहळा आहे अभिनेता आदि पिनिसेट्टी आणि अभिनेत्री निक्की गलरानी यांचा. अतिशय शाही पद्धतीनं या जोडीनं लग्नगाठ बांधली. चाहत्यांच्या कानांवर जेव्हा या जोडीच्या लग्नाही बातमी आली, तेव्हा त्यांच्याकडूनही या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले. 

आदि आणि निक्की यांनी मार्च महिन्यातच साखरपुडा केला होता. ज्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 

कुटुंबीय आणि खास मित्रांच्याच उपस्थितीत ही जोडी लग्नबंधनात अडकली. बऱ्याच वेळापासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या आदि आणि निक्की यांनी घेतलेला लग्नाचा निर्णय पाहता सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा केला जात आहे. 

निक्की आणि आदिच्या ब्रायडल लूकनं विशेष ट्रेंड सेट केला. शांत रंगांची निवड करत एकमेकांना साजेशा वेशभूषेला त्यांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं होतं.