‘जुली २’च्या टीझरमध्ये साऊथची स्टार राय लक्ष्मीचा हॉट अवतार

नेहा धुपिया या अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळवून देणा-या ‘जुली’ या बोल्ड सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘जुली २’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. ‘जुली २’मध्ये साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी ही दिसणार आहे. राय लक्ष्मी या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. 

Updated: Aug 30, 2017, 11:01 AM IST
‘जुली २’च्या टीझरमध्ये साऊथची स्टार राय लक्ष्मीचा हॉट अवतार title=

मुंबई : नेहा धुपिया या अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळवून देणा-या ‘जुली’ या बोल्ड सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘जुली २’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला. ‘जुली २’मध्ये साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी ही दिसणार आहे. राय लक्ष्मी या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. 

राय लक्ष्मी हिने साऊथमध्ये आतापर्यंत ५० पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे. तर काही बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने सहायक भूमिका साकारल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ मध्ये तिने एक भूमिका केली होती. आता तिने या सिनेमात अधिक बोल्ड अवतारात बघायला मिळणार आहे. 

बोल्ड भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्री तिच्या इमेजला शोभेल अशीच भूमिका या सिनेमात साकारली आहे. या सिनेमात तिने अनेक बिकीन सीन्स आणि सेमी न्यूड सीन्स दिले आहेत. ‘जुली २’ या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक शिवदसानी याने केलं आहे. याआधीच्या सिनेमाचंही दिग्दर्शन त्यानेच केलं होतं.