कथेची डिमांड असेल तर मी तेही करेन - दिशा पटनी

अभिनेत्री दिशा पटनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी डान्स व्हिडिओमुळे ती सोशल मीडियात धुमाकूळ घालत असते. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी सिनेमांची वाट बघत आहेत. अशात दिशाने स्टेटमेंट दिलंय त्याची चर्चा होतीये. 

Updated: Aug 30, 2017, 09:33 AM IST
कथेची डिमांड असेल तर मी तेही करेन - दिशा पटनी title=

मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी डान्स व्हिडिओमुळे ती सोशल मीडियात धुमाकूळ घालत असते. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी सिनेमांची वाट बघत आहेत. अशात दिशाने स्टेटमेंट दिलंय त्याची चर्चा होतीये. 

दिशा म्हणाली की, जर एखाद्या सिनेमात भूमिकेची आणि स्क्रिप्टची गरज असेल तर ती पूर्ण कापून बाल्ड होण्यास तयार आहे. ती म्हणाली की, ‘याबाबत माझा निर्णय सिनेमाची स्क्रिप्ट आणि भूमिकेवर अवलंबून असेल. जर मला वाटलं की, खरंच याचा सिनेमाला फायदा होणार आहे तर मी नक्की तसं करेन’.

दिशाला विचारण्यात आले की, ती तिच्या लूक्समध्ये जास्त प्रयोग करताना दिसत नाही. यावर ती म्हणाली की, ‘बहुतेक अभिनेत्री या विविध जाहीरातींशी जोडलेल्या असतात. अनेक प्रॉडक्टच्या त्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर असतात. अशावेळी आम्हाला जास्त काळ एका खास लूकमध्ये रहावं लागतं’.