मुंबई : आजकाल प्रत्येकात कच्च्या बदामाचा फिव्हर आहे. आणि आता या यादीत अल्लू अर्जुनच्या मुलीचंच म्हणजेच आपल्या पुष्पराजच्या राजकुमारीचं नावही जोडलं गेलं आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा देखील हा ट्रेंड फॉलो करताना दिसली आहे. अलीकडेच अल्लू अर्जुनने त्याच्या मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि चाहते या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करत अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, माझा छोटा बदाम अरहा. या व्हिडिओला काही वेळातच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओमध्ये अरहा गुलाबी नाइट सूटमध्ये दिसत आहे. यादरम्यान, तिचा लूक खूपच क्यूट दिसत आहे आणि चाहत्यांना तिच्या डान्स मूव्ह्सचं देखील वेड लागले आहेत. क्यूट एक्सप्रेशन दे पुष्पाची लाडकी चाहत्यांना तिचं वेड लावत आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनचे चाहते या रीलचं खूप कौतुक करत आहेत. आणि मुलगी अरहा सुद्धा तिच्या वडिलांप्रमाणेच खूप हुशार असल्याचं बोललं जात आहे.
अल्लू अर्जुन अनेकदा आपल्या मुलीसोबत सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. वडील आणि मुलगी यांच्यात खूप छान बॉन्डिंग आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा लवकरच तेलुगु चित्रपट 'शकुंतलम' मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 'शकुंतलम' चित्रपटात समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अरहा या चित्रपटात राजकुमारी भरताच्या भूमिकेत दिसणार आहे.