भाजप खासदाराचा 'गदर' डान्स व्हायरल

मै उत्थे दिल छोड आया.... 

Updated: Feb 17, 2020, 11:21 AM IST
भाजप खासदाराचा 'गदर' डान्स व्हायरल  title=
भाजप खासदाराचा 'गदर' डान्स व्हायरल

मुंबई : साहसदृश्य आणि धाडसी भूमिकांचा स्वीकार करत त्याच धाटणीच्या भूमिकांमुळे एक काळ गाजवणाऱ्या अभिनेता sunny deol  सनी देओल यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. खासदारपद भूषवणारा हा चेहरा राजकारणात सक्रिय झाला आणि अनेकांनाच याचा आनंदही झाला. कलेसोबतच आता राजकीय कारकिर्द गाजवणाऱ्या याच अभिनेत्याचा एक धमाल व्हिडिओ video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंजाबमधील एका महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यानच्या या व्हिडिओमध्ये सनी देओल चक्क त्यांच्या चित्रपटातील एका गीतावर ठेका धरताना दिसत आहेत. 'इक मोड आया... मै उत्थे दिल छोड आया...', असे बोल असणाऱ्या गदर या चित्रपटातील गीतावर सनी देओल यांनी ठेका धरला. त्यांचा हा अंदाज पाहून उपस्थितांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.  

सनी देओल यांनी फक्त ठेकाच धरला नाही, तर त्यांच्या चित्रपटातील काही गाजलेले डायलॉगही उपस्थितांसमोर सादर केले. 'ये जो ढाई किलो का हाथ है ना...' इथपासून ते अगदी 'तारीख पे तारीख'पर्यंतचे संवाद त्याने यावेळी म्हणून दाखवले. बस्स.... मग आणखी काय हवं होतं. खुद्द सनी देओल अस्सल पंजाब शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून  विद्यार्थांनीही एकच कल्ला केला. 

...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

एक सेलिब्रिटी असण्यासोबत सनी आता एक राजकीय व्यक्तीमत्वंसुद्धा आहेत. पण, त्यांच्या वागण्याबोलण्यात असणारा सहजपणा पाहता सर्वसामान्यांशी असणारं त्यांचं नातं आणि हे नातं जपण्यासाठीची त्यांची धडपड ही प्रशंसेची बाब ठरत आहे.