मुंबई : आपल्या जबरदस्त एक्टिंगसोबतच अनेक अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरमुळे अभिनेता शाहिद कपूरचं नाव नेहमी चर्चेत आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिदचं नाव करिना कपूर आणि प्रियांका चोप्रामुळे जास्त चर्चेत आलं होतं. आज आम्ही तुम्हाला करिना आणि शाहिद विषयी सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्टनुसार 2004 मध्ये आलेला फिदा सिनेमाच्या सेटवर शाहिद आणि करिनामध्ये जवळिकता वाढत होती. म्हटलं जातं की, स्वत: करिनाने शाहिदला प्रपोज केलं होतं. जवळ-जवळ दोन-अडीच वर्ष या दोघांचं अफेअर चाललं मात्र यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
मीडिया रिपोर्टनुसार, 'फिल्म जब वी मेट' सिनेमाच्या शूटिंगवेळी करिना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं. असं म्हटलं जातं की, सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या टप्यात हे कपल एकमेकांपासून एतकं दूर गेलं होतं की, हे दोघं एकमेकांसोबत बोलायचं देखील नाही. शाहिदसोबत ब्रेकअपनंतर करिनाच्या आयुष्यात सैफने एंट्री घेतली होती. असं म्हटलं जातं की, टशन सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि सैफमध्ये जवळिकता वाढली होती. एकदा एका मुलाखीतमध्ये शाहिदला विचारण्यात आलं की, तुला कधी करिनाला सैफसोबत पाहून वाईट वाटायचं का?
यावर उत्तर देत शाहिद म्हणाला की, ''असं म्हणणं चुकीचं ठरेल की, मला कधी कसलाच फरक पडला नाही. शेवटी मी पण एक माणूस आहे. प्रत्येकवेळी हे पाहणं आणि याबद्दल वाचल्यानंतर कुठे ना कुठेतरी मला पण वाईट वाटायचं.'' 2012 मध्ये करिना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न केलं. त्याचबरोबर शाहिद कपूरने देखील मीरा राजपूतसोबत २०१५ मध्ये लग्न केलं.