'सरदार असल्यानं हातातून भूमिका निसटली'

नुकताच मनज्योत सिंहचा एक धक्कादायक खुलासा

Updated: Jul 10, 2019, 08:55 PM IST
'सरदार असल्यानं हातातून भूमिका निसटली' title=

मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटातून अभिनेता मनज्योत सिंह याला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यानं 'डिम्पी'ची भूमिका निभावली होती. परंतु, नुकताच मनज्योतनं एक धक्कादायक खुलासा केलाय. आपण सरदार असल्यामुळे सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम मिळायला अवघड गेलं, असे त्यानं एका कार्यक्रमात बोलताना म्हटलंय.

'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटाने लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याच्यासाठी बॉलिवूडचा रस्ता खुला झाला. याआधी मनज्योतला 'ओए लक्की! लक्की ओए!' या विनोदी चित्रपटात काम करण्याची संधी नाकारण्यात आली होती मात्र त्याला पुन्हा या चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली होती. 'ओए लक्की! लक्की ओए!' चित्रपटात त्याने विनोदी भूमिका निभावली होती आणि त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाची पुरस्कार देण्यात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाई करू शकला नाही.  
मनज्योतनं नुकतीच बोलून दाखवली की, तो सरदार असल्यामुळे या बॉलिवूडमध्ये काम मिळणे अवघड गेले परंतु, 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटात काम मिळाले तेव्हा मात्र त्याने त्याच्या अभिनयाची छाप पाडली... या चित्रपटातून मनज्योतला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो 'फुक्रे' या चित्रपटातही दिसला. 

मनज्योत लवकरच 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात तो विनोदी भूमिकेत दिसणार आहे. 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यानंतर मनज्योतचा 'फुक्रे ३' हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी पडद्यावर दाखल होईल, याची प्रेक्षकांनाही उत्सुकता लागलीय.