राज कपूर यांची पत्नी घर सोडून साडेचार महिने मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये का राहिली?

राज कपूर यांनी पत्नीला भरपूर मनवलं. त्यांच्या पत्नीने राज कपूर यांच्याकडून वचन घेतलं की...

Updated: May 20, 2021, 03:32 PM IST
राज कपूर यांची पत्नी घर सोडून साडेचार महिने मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये का राहिली? title=

मुंबई : सुमारे 2 दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला आजही लोकांच्या हृदयावर राज्य करतात. वैजयंती माला या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी त्या काळातील सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. वैजयंती माला यांनी दक्षिण इंडस्ट्रीनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. वयाच्या १३व्या वर्षी वैजयंती माला यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांनी 'बहार' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

१९६४ सालच्या 'संगम' या चित्रपटात त्यांनी राधाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री होण्याबरोबरच वैजयंती माला एक उत्तम डान्सरही होत्या. ज्याची झलक त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसली. त्या भरतनाट्यम, कर्नाटक स्टाईलच्या गायिका आणि नृत्यशिक्षिका देखील होत्या. वैजयंती माला यांच्या हिट चित्रपटांमध्ये नया दौर, नई दिल्‍ली, देवदास, मधुमति, गंगा जमुना आणि संगम यांचा समावेश होता.

वैजयंती माला यांचं वैयक्तीक आयुष्यदेखील बर्‍याच वादात होतं. ६०च्या दशकात, वैजयंती माला यांचं नाव शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्याशी जोडलं गेलं होते. असं म्हणतात की, या दोघांनाही हे नातं पुढे न्यायचं होतं. पण राज कपूर आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलंही होती.

राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांना जेव्हा वैजयंती माला आणि राज यांच्या नात्याविषयी समजलं, तेव्हा त्या घर सोडून गेल्या आणि साडेचार महिने मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये थांबल्या.

राज कपूर यांनी पत्नीला भरपूर मनवलं. त्यांनी राज कपूर यांच्याकडून वचन घेतलं की, ते कधीच वैजयंती मालासोबत चित्रपट करणार नाहीत. ही अट राज कपूर यांनी देखील मान्य केली. 'संगम' चित्रपटानंतर वैजयंती माला आणि राज कपूर यांनी पुन्हा कधीही कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही.

1968 मध्ये वैजयंती माला यांनी चमनलाल बाली यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांना सुचिंद्र बाली एक मुलगा आहे. वैजयंती माला आणि चमनलाल बाली यांची लव्हस्टोरीदेखील खूप इंट्रेस्टींग आहे.

असं म्हणतात की, एकदा वैजयंती माला यांना न्यूमोनिया झाला होता, तेव्हा डॉ बाली त्यांच्यावर उपचार करत होते. उपचारादरम्यान दोघही ऐकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.