'विरुष्का' मुंबईत दाखल!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सिने-अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं आज मुंबईत आगमन झालं.

Updated: Dec 22, 2017, 08:16 PM IST
'विरुष्का' मुंबईत दाखल! title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सिने-अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं आज मुंबईत आगमन झालं.

विरुष्कानं अलिकडेच इटलीमध्ये लग्न केलंय. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याची सोशल मीडियापासून सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती.

त्याच्या विवाहानिमित्त काल गुरूवारी नवी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला उपस्थित होते.

येत्या २६ डिसेंबरला मुंबईतील ग्रॅन्ड ह्यात हॉटेलमध्ये आणखी एक स्वागत सोहळा आयोजित करण्यात आलाय. 

बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय.