Trailer Video : विराट कोहली बनला सुपर हिरो..

अफलातून ट्रेलर 

Trailer Video : विराट कोहली बनला सुपर हिरो..  title=

मुंबई : विराट कोहलीची सध्या क्रिकेट सोडून वेगळ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. असं म्हटलं जातं की, विराट कोहली कोणत्या तरी सिनेमामार्फत अभिनयात करिअर करणार आहे. नंतर याचा खुलासा झाला की, विराट कोहली गारमेंट्स ब्रँडच्या प्रचाराकरता नव्या लूकमध्ये उतरला आहे. ज्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. या पोस्टरमध्ये सांगण्यात आलं की, विराट 'ट्रेलर : द मूवी' दिसणार आहे. 

यानंतर विराट कोहलीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये विराट #Wrogn ब्रँडचा प्रचार करण्यात आला आहे. विराट यामध्ये अॅक्शन हिरोच्या रुपात दिसणार आहे. 

हा व्हिडिओ अतिशय मजेदार आहे. विराटचा हा लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्की वाटेल की त्याला सिनेमात नक्की बघावं. विराट कोहलीला नुकतंच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून खेळ रत्न पुरस्कार मिळालं आहे. यावेळी विराटसोबत अनुष्का देखील होती.