तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप

काय केला आरोप? 

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप  title=

मुंबई : 'आशिक बनाया आपने' या बॉलिवूड सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलेली तनुश्री दत्ता. 2010 मध्ये शेवटची सिल्वर स्क्रिनवर तनुश्री दत्ता दिसली. एवढी वर्षे इंडस्ट्र्रीपासून लांब राहिलेल्या तनुश्री दत्ताने मोठा खुलासा केला आहे. सिनेमाच्या सेटवर सेक्युअल हेरासमेंटची शिकार ठरलेली तनुक्षीने झूम टीव्हीसोबत बोलतात हे सांगितलं. नाना पाटेकरांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. पुढे ती म्हणाली की, प्रत्येक जण नाना पाटेकर यांना ओळखतात. महिलांशी ते कशा पद्धतीने वागतात. 

नाना पाटेकर यांच्या बॅकग्राऊंडबद्दल सगळ्यांनाच माहित आहे, त्यांनी एकेकाळी अभिनेत्रीला मारलं आहे. त्यांची छेडछाड देखील केली आहे. महिलांसोबत कायम नाना पाटेकर यांचा व्यवहार चुकीचा राहिला आहे. 

मात्र नाना पाटेकरच्या या स्वभावबद्दल कोणत्याच पब्लिकेशनने काहीच छापलं नाही. नाना पाटेकरांनी माझ्यासोबत चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझ्यासोबत इंटीमेट सीन करायचा नव्हता. आणि महत्वाचं म्हणजे ते माझ्या कॉन्ट्रक्टमध्ये नव्हतं.तसेच पुढे तनुश्री म्हणाली की, या प्रकरणावर सगळ्यांनी गॉसिप केलं पण कुणी काहीच बोललं नाही. इथे अशा कॅरेक्टरची लोकं आहेत जो विचार करतात की, ही मुलगी असे ग्लॅमरस रोल करते तर ती सगळं काही करू शकते. अशी लोकं मागे खूप चुकीची चर्चा करतात.