विरुष्काच्या लग्नासाठी कुटुंबासोबतच पंडीतजीही इटलीला रवाना!

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का यांच्या लग्नाचा 'बॅन्ड - बाजा - बारात' कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जोरजोरात वाजताना दिसतोय.

Updated: Dec 8, 2017, 09:29 PM IST
विरुष्काच्या लग्नासाठी कुटुंबासोबतच पंडीतजीही इटलीला रवाना! title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का यांच्या लग्नाचा 'बॅन्ड - बाजा - बारात' कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जोरजोरात वाजताना दिसतोय.

Anushka’s brother (in black) with the <i>pandit ji</i>. &nbsp;
बाबा अनंत आणि अनुष्काचा भाऊ

'शुभमंगल सावधान' म्हणणार?

विरुष्काच्या लग्नाच्या बातम्यांमध्येच अनुष्का शर्मा ज्याना आपले गुरु मानते असे अनंत बाबाही इटलीला रवाना झालेत. पुजारी असलेले बाबा अनंत अनुष्काच्या कुटुंबीयांसोबत इटलीला रवाना झाल्याचं कॅमेऱ्यातही कैद झालंय, हे विशेष... ते अनुष्काच्या आईचेही गुरु आहेत.

गुरुंचे आशीर्वाद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिद्वारपासून बाबा अनंत एकटेच मुंबईसाठी रवाना झाले होते. ते आता २४ डिसेंबरला हरिद्वारला परतणार आहेत. बाबा अनंत हरिद्वारेच्या पथरी अंबुवाला स्थित आश्रमाचे अध्यक्ष आहेत. 

गेल्या २८ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री उशीरा विराट आणि अनुष्का गुपचूपपणे हरिद्वारला दाखल झाले होते. इथं त्यांनी बाबा अनंत यांचे आशिर्वादही घेतले होते.

जुना फोटो होतोय वायरल

हे पंडित आणखी कुणी नाहीत तर ज्यांच्यासोबत गेल्या वर्षी अनुष्का आणि विराटचा फोटो वायरल झाला होता ते बाबा अनंत आहेत... 

anushka 5
जुना फोटो पुन्हा होतोय वायरल