corona : अवघ्या 24 तासांत विरूष्काकडून इतक्या कोटींचा निधी जमा

विरूष्का कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी निधी जमा करत आहेत. 

Updated: May 8, 2021, 06:03 PM IST
corona : अवघ्या 24 तासांत विरूष्काकडून इतक्या कोटींचा निधी जमा title=

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.  देशात रूग्ण संख्या तर दिवसागणिक वाढत आहे, पण कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटी देशाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढे आले आहेत. विरूष्का कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी निधी जमा करत आहेत. 7 कोटी  रूपयांपर्यंत निधी जमा करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे. 

विराट आणि अनुष्काच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. विरूष्काने अवघ्या  24 तासांत 3.6 कोटी रूपयांचा निधी जमा केला आहे. यामध्ये  2 कोटी रूपये खुद्द अनुष्का आणि विराटने दान केले आहेत. विरूष्का राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसााद मिळाल्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. '24 तासात 3.6 कोटी रूपये निधी जमा झाला आहे. अतिशय उत्तम प्रतिसाद. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्न करूया...' असं कॅप्शन देत तिने सर्वांचे आभार मानले आहेत.  विराट-अनुष्का Kettoयांच्यासोबत मिळून  निधी जमा करत आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेमध्ये अनेक गरजूंची गैरसोय झाली. अनुष्काने आपल्या वाढदिवसादिवशी तयार केलेला व्हिडिओत तिने याबाबत हळहळ व्यक्त केली. तेव्हापासून ती या उपक्रमाची माहिती देत होती. अखेर विराट आणि अनुष्काने पुढाकार घेत या उपक्रमाची सगळी माहिती दिली आहे.