Indian Cricket Team returns: शनिवारी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया अखेर आज म्हणजेच गुरुवारी भारतात परतली आहे. सकाळी 6.30 च्या सुमारास टीम इंडिया दिल्लीच्या एअरपोर्टवर दाखल झाली. यानंतर आता भारताच्या सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट घेतली आहे.
टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज भारतात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत खेळाडूंनी ब्रेकफास्ट देखील केला. यावेळी टीमच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींच्या हाती ट्रॉफी देत फोटो काढला आहे.
#WATCH | Indian Cricket team meets Prime Minister Narendra Modi at 7, Lok Kalyan Marg.
Team India arrived at Delhi airport today morning after winning the T20 World Cup in Barbados on 29th June. pic.twitter.com/840otjWkic
— ANI (@ANI) July 4, 2024
बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ सकाळी दिल्लीत पोहोचली होती आहे. यानंतर सकाळी टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.
गुरूवारी भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे. यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे हे मुंबईचे खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व खेळाडू उद्या विधानभवनात येणार आहेत. या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाणार आहे.