Viral Video: नील जेव्हा शाहरुखला म्हणाला होता Shut Up! व्हिडीओ होतोय ट्रेंड, नेमकं काय घडलं? येथे वाचा

Shah Rukh Khan Neil Nitin Mukesh Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश आणि शाहरूख खान यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या एका अवोर्ड फॅग्शनमधला एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 9, 2023, 05:35 PM IST
Viral Video: नील जेव्हा शाहरुखला म्हणाला होता Shut Up! व्हिडीओ होतोय ट्रेंड, नेमकं काय घडलं? येथे वाचा title=
August 9, 2023 | viral video neil nitin mukesh once asked shah rukh khan to shut up at an award function

Shah Rukh Khan Neil Nitin Mukesh Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी शाहरूख खान आणि नील नितीन मुकेश यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटले परंतु या व्हिडीओमध्ये शाहरूख खानला चक्क नील नितीन मुकेश हा Shut Up बोलताना दिसतो आहे. त्यामुळे यावेळी नेमकं घडलंय काय हे पाहण्यासाठी नेटकऱ्यांनी अक्षरक्ष: तुटून पडले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. शाहरूख खान हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यावर्गात त्याची चांगलीच क्रेझ असते. शाहरूख खानला कोणी प्रत्युत्तर देईल किंवा त्याला कोणी उलट बोलेल हे काहीच शक्य नाही. परंतु या अभिनेत्यानं ते करून दाखवले होते. परंतु नक्की हा प्रकार काय होता आणि असं नेमकं काय घडलं होतं? या लेखातून जाणून घेऊया. 

सध्या शाहरूख खान आणि नील नितीन मुकेश यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. परंतु यावेळी लोकं गंमत करताना दिसत आहेत. यावेळी या अवॉर्ड शोमधून सैफ अली खान आणि शाहरूख खान हे सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. तेव्हा त्यांची उपस्थित प्रेक्षकांसमवेत मज्जा मस्ती चालत असते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या नील नितीन मुकेश याच्या ते गप्पा मारायला सुरूवात करतात आणि मध्येच काय होतं, काही कळतं नाही तेवढ्यातच नील नितीन मुकेश हा शाहरूख खान आणि सैफ अली खान यांना Shut Up असं म्हणतो. त्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळीच चर्चा रंगायला लागते. कोणी हसू लागतं, कोणी गंभीर होतं तर कोणी चक्क टाळ्या वाजावायला लागतं. तेव्हा नक्की पाहुया या व्हिडीओत आहे तरी काय? 

हेही वाचा  - TMKOC ची पात्रं योद्धा असते तर? कल्पना भारीये; AI नं केली साकार

पाहा व्हिडीओ 

या अवोर्ड शोमध्ये शाहरूख खान हा नील नितीन मुकेशला विचारतो की, ''मला तुझ्यासाठी एक प्रश्न आहे की तु नील नितीन मुकेश अशी तीन नावं आपल्या नावात का घेतोस? भैया, आपका सरनेम का पर हैं? सगळे फक्त नावंच आहे? आडनाव कुठे आहे?'' त्यावर नील नितीन मुकेश चिडतो आणि म्हटतो की, ''चांगला प्रश्न विचारलात, सर. धन्यवाद. मला थोडं बोलण्यासाठी संधी मिळेल का? हा खरंतर माझा अपमान आहे. मला वाटतं की हे बरोबर नाही. मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल की, माझे वडीलही येथे बसेल आहेत. मला वाटतंय तुम्ही शांत बसा (Shut Up), मला माफ करा.''

सिद्धार्थ कनन यांच्या मुलाखतीत त्यानं खुलासा केला आहे की यावेळी नील नितीन मुकेशही गंमत करत होता आणि त्याला शाहरूखनं याबद्दल कल्पना दिली होती.